जातीच्या नावाने स्थापन झालेले महासंघ निषेधार्ह - सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 05:21 AM2018-04-30T05:21:52+5:302018-04-30T05:21:52+5:30

अलीकडे ब्राह्मण, मराठा, ओबीसी आदी जातींच्या नावाने स्थापन झालेले महासंघ हे निषेधार्हच म्हणावे लागतील. कारण यामधून जातीयवाद निकाली निघणार की वाढणार हा प्रश्न उपस्थित होतो

The federation constituted by the name of caste is prohibited - Sabnis | जातीच्या नावाने स्थापन झालेले महासंघ निषेधार्ह - सबनीस

जातीच्या नावाने स्थापन झालेले महासंघ निषेधार्ह - सबनीस

Next

कोल्हापूर : अलीकडे ब्राह्मण, मराठा, ओबीसी आदी जातींच्या नावाने स्थापन झालेले महासंघ हे निषेधार्हच म्हणावे लागतील. कारण यामधून जातीयवाद निकाली निघणार की वाढणार हा प्रश्न उपस्थित होतो, असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रविवारी येथे व्यक्त केले.
बुद्धपौर्णिमेनिमित्त आयोजित आठव्या प्रबोधनवादी साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, अलीकडे देशाला हिंदुत्ववादाचा धोका निर्माण झाला आहे का?, सर्वच जाती-धर्मात कट्टरवाद आला आहे का?,भारताची व महाराष्टÑाची सांस्कृतिक एकात्मता धोक्यात आली आहे का? हे पाहण्याची वेळ आता आली आहे.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद पाटील म्हणाले,लहानपणापासूनच मुलांवर चुकीचे संस्कार होऊन बाराखडीमधूनही त्यांच्यावर वर्णव्यवस्था बिंबवली जात आहे. आपण अज्ञानाचे बळी ठरल्याने आपले प्रबोधन होऊ शकलेले नाही. समानतेसाठी विविध देशांत क्रांती झाली पण भारतात होऊ शकली नाही, कारण येथे कोणाला वैदिक चौकट पार करता आली नाही.
करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात शासकीय पुजारी नियुक्त करण्याचा कायदा सरकारने मंजूर केला. त्यासाठी लढा दिलेल्या कार्यकर्त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.

Web Title: The federation constituted by the name of caste is prohibited - Sabnis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.