शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासक्रम बंद पडण्याची भीती

By admin | Updated: December 2, 2014 23:35 IST

पेच पुनर्रचित तंत्र अभ्यासक्रमाचा : ‘खर्च जास्त विद्यार्थी कमी’ची शक्यता

प्रदीप शिंदे-कोल्हापूर -व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत पूर्वव्यवसायांचा नवीन अभ्यासक्रमात लेथ मशीन व मिलिंग मशीनवर जॉब हे विषय घेतले आहेत. त्यामुळे हा अभ्यासक्रम सुरू करायचा असेल, तर संस्थाचालकांना लाखो रुपयांची मशिनरी विकत घ्यावी लागणार असल्याने अनेक संस्था हा अभ्यासक्रम बंद करण्याचा विचार करतील. तसेच व्ही-३ या विषयात अभियांत्रिकी चित्रकला (इंजिनिअरिंग ड्रॉइंग) व माहिती तंत्रज्ञान या विषयांचा नवीन अभ्यासक्रमात समावेश नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी याकडे पाठ फिरविण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘विद्यार्थी कमी आणि खर्च जास्त’, अशी स्थिती असल्याने हा अभ्यासक्रमच बंद पडेल.नवीन अभ्यासक्रमात व्ही-२ या विषयामध्ये टर्निंग, मिलिंग यासारखा अभ्यासक्रम समाविष्ट केल्याने या विषयासाठी लेथ मशीन व मिलिंग मशीन संस्थाचालकांना विकत घ्यावी लागणार असल्याने त्यांना लाखो रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. तसेच या यंत्रसामग्रीसाठी नवीन जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत अनेक संस्थाचालक विचार करतील. त्याचसोबत व्ही-३ या विषयात अभियांत्रिकी चित्रकला (इंजिनिअरिंग ड्रॉइंग) व माहिती तंत्रज्ञान या विषयांचा समावेश आहे. मात्र, अभियांत्रिकी चित्रकला हा विषय अभियांत्रिकी शिक्षणाचा पाया असल्यामुळे पुढील अभ्यासक्रम सोपा जावा यासाठी अनेक विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे वळत होते; मात्र नवीन अभ्यासक्रमात याचा समावेश नसल्याने अनेक विद्यार्थी यापासून दूर जातील. विद्यार्थी नसल्याने संस्थाचालकांना हा अभ्यासक्रम बंद करावा लागेल. अपुऱ्या सुविधा असताना नवा अभ्यासक्रम सुरू करणे म्हणजे विद्यार्थ्यांना अर्धवट ज्ञान दिल्यासारखे आहे. यातून नुसते कामगार तयार होतील, अशी भीती अशासकीय तांत्रिक, शिक्षण कर्मचारी महासंघातून व्यक्त होते आहे. तंत्र शिक्षणामध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करणे हा उपक्रम कौतुकास्पद आहे. मात्र, या अभ्यासक्रमामुळे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. नवीन अभ्यासक्रमानुसार नवीन यंत्रसामग्री संस्थाचालकांना स्वबळावर घेणे शक्य होणार नाही. यासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक होणार आहे. १९९८ ते १९९९ पासून वेतनेतर अनुदान शासनाने बंद केले आहे. त्यामुळे कोणत्याही शिक्षण संस्थांना एवढी गुंतवणूक करणे शक्य होणार नाही. अभ्यासक्रमाची निर्मिती करताना या सर्व गोष्टींचा विचार करावा, अन्यथा अनेक शिक्षण संस्थांमधून हा अभ्यासक्रम बंद होईल. -प्रा. जयंत असगावकर, सचिव, कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघ