शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: चार वर्षांच्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधम बापास २० वर्षे सक्तमजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 14:25 IST

जानेवारी २०२० मधील गुन्हा, पत्नीने कोडोली पोलिसांत दिली होती फिर्याद

कोल्हापूर : अंगणवाडीत शिकणाऱ्या अवघ्या चार वर्षांच्या स्वत:च्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने नराधम बापाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी बुधवारी २० वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जानेवारी २०२० मध्ये गुन्हा घडल्यानंतर आरोपीच्या पत्नीने कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.अतिरिक्त सरकारी वकील मंजूषा पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा कोडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात पत्नी आणि तीन मुलींसह राहत होता. २२ जानेवारी २०२० रोजी अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलीच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम असल्याने तिच्यासोबत आई, मोठी बहीण, मावशी, मामा, असे शाळेत गेले होते. त्यावेळी पीडित मुलीने ओटीपोटात दुखत असल्याचे आईला सांगितले. आईने पाहणी केली असता, मुलीच्या ओटीपोटाखाली सूज आल्याचे लक्षात आले. कुठे पडली का? काही लागले का? अशी विचारणा केल्यानंतर वडिलांनी घरात आणि परसात तीन वेळा तिच्यासोबत केलेल्या गैरकृत्याची माहिती मुलीने दिली.पतीनेच पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे लक्षात येताच पत्नीने कोडोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी नराधम बापावर गुन्हा दाखल केला. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी तपास करून आरोपीविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.१२ साक्षीदार तपासलेॲड. मंजूषा पाटील यांनी न्यायाधीशांसमोर १२ साक्षीदार तपासले. यात पीडित मुलीसह तिची मोठी बहीण, आई, मावशी, मामा, वैद्यकीय अधिकारी आणि शाळेतील शिक्षिकेची साक्ष महत्त्वाची ठरली. साक्षीदारांची साक्ष आणि ॲड. पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश अग्रवाल यांनी आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी, एक हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावली. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करून त्याला कळंबा कारागृहात पाठवले.

नात्याला काळिमा फासणारी घटनामुलीचा सर्वाधिक विश्वास आई- वडिलांवर असतो. मात्र, नराधम बापाने चिमुरड्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून नात्यालाच काळिमा फासला. त्याच्या घृणास्पद कृत्याबद्दल जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, असा युक्तिवाद ॲड. पाटील यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस