शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दुर्देवी घटना! आजऱ्यात मुलीच्या लग्नादिवशीच वडिलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 16:19 IST

सकाळपासूनच लग्नाची धांदल सुरु असतानाच माणगावकर कुटुंबावर काळाने घाला घातला.

आजरा : मुलीच्या लग्नादिवशीच वडिलांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आजऱ्यात घडली. प्रा. हसनसाब अब्दुल माणगावकर असे या मृत वडिलांचे नाव आहे. माणगावकर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हसनसाब माणगावकर हे आजरा महाविद्यालयातील हिंदी विषयाचे प्राध्यापक होते.सकाळपासूनच लग्नकार्याची धावपळ सुरु असतानाच ही घटना घडल्याने उपस्थित नातेवाईकांना धक्काच बसला. विवाहासाठी आलेल्या नातेवाईक व मित्र परिवाराला त्यांच्यावर अंत्यसंस्काराची करण्याची दुर्देवी  वेळ आली.प्रा. हसनसाब माणगावकर यांच्या अल्फिया या मुलगीचा आज विवाह होता. सकाळपासूनच सर्वांची धावपळ सुरू होती. त्यातच सरांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना उपचारासाठी आजरा व गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. लग्नासाठी आलेल्या नातेवाईक, मित्रमंडळी व कुटुंबीयांवर एकच शोककळा पसरली. 

एक निगर्वी व कायम हसतमुख चेहरा असणाऱ्या सरांच्या निधनामुळे सर्व धर्मीयांमध्ये शोककळा पसरली. हिंदू-मुस्लीम समाजाला एकत्र करून दोन्ही समाजात एकोपा घडवून आणणारे प्रा. हसनसाब समाज प्रिय शिक्षक होते. सुंदर हस्ताक्षर व उत्कृष्ट फलक लेखनामुळे ते विद्यार्थी प्रिय होते.  इंग्रजी विषयात एम.ए.पर्यंत शिक्षण घेतलेल्या लाडक्या अल्फियाचे थाटात लग्न करण्याचा सरांचा मनोदय होता. पण लग्नापूर्वीच सरांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे व दोन मुली भाऊ असा परिवार आहे... सर बाबा को बुलाव..प्रा. हसन माणगावकर यांचा पार्थिव आजऱ्यातील घरी आणल्यानंतर सर्व शिक्षक व विद्यार्थी अंत्यदर्शन घेण्यासाठी घरी गेले. सर्वांना पाहून लाडकी अल्फिया हिने एकच हंबरडा फोडला व " सर बाबा को बुलाव " अशी आर्त हाक दिली. त्यावेळी सर्वांनाच हुंदका आवरता आला नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर