शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

मुलांचा वाद सोडवायला गेलेल्या वडिलांचा मृत्यू, दोघांना अटक; कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 12:43 IST

कोल्हापूर : मुलांची मारामारी सोडविण्यासाठी गेलेल्या वडिलांचा झटापटीत जमिनीवर पडून मृत्यू झाला. मीरअहमद अब्बास मुल्ला (वय ७५) असे मृताचे ...

कोल्हापूर : मुलांची मारामारी सोडविण्यासाठी गेलेल्या वडिलांचा झटापटीत जमिनीवर पडून मृत्यू झाला. मीरअहमद अब्बास मुल्ला (वय ७५) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी गुलाब मीरअहमद मुल्ला (४५) आणि फिरोज मीरअहमद मुल्ला (३०, तिघे रा. सुतार मळा, लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार शनिवारी (दि. २४) मध्यरात्रीच्या सुमारास सुतार मळ्यातील राहत्या घरात घडला.लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्षतीर्थ वसाहतीमधील सुतार मळ्यात मीरअहमद मुल्ला हे त्यांची पत्नी रुक्साना, तीन मुले, दोन सुना आणि नातवंडांसह राहत होते. मोठा मुलगा गुलाब हा अविवाहित असून, रंगकाम करतो. दोन नंबरचा मुलगा जावेद हा मिळेल ते काम करतो. लहान मुलगा फिरोज हा चित्रपट निर्मिती क्षेत्रात सहायक दिग्दर्शक म्हणून काम करतो. मीरअरमद मुल्ला हे शहरातील एका चित्रपटगृहात तिकीट बुकिंग मॅनेजर म्हणून काम करीत होते.शनिवारी रात्री उशिरा घरात लहान मुले खेळताना आरडाओरडा करीत होते. या रागातून गुलाब हा मुलांच्या अंगावर धावून गेला. यातून गुलाब आणि फिरोज या भावांमध्ये वाद सुरू झाला. दोघांची मारामारी सुरू होताच वडील मीरअहमद आणि आई रुक्साना हे वाद सोडवायला गेले. त्यावेळी झालेल्या झटापटीत मीरअहमद जमिनीवर पडून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली.मुलांनी त्यांना पाणी देऊन झोपविले. मात्र, काही वेळाने त्रास वाढून ते बेशुद्ध पडले. मध्यरात्री दीडच्या सुमारास त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक श्रीराम कणेरकर, उपनिरीक्षक खंडू गायकवाड, हवालदार संजय कोळी यांनी सुतार मळ्यात जाऊन पंचनामा केला. गुलाब आणि फिरोज या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.दोघांवर गुन्हानिष्काळजीपणे झटापट करून वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल पोलिसांनी गुलाब आणि फिरोज या दोघांवर गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत. लहान मुलांमधील वादासह अन्य कारणांचाही शोध सुरू असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस