शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुलाला फासावर लटकवत पित्याची गळफास घेऊन आत्महत्या, कोल्हापुरातील कणेरी येथील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 14:18 IST

कारणांचा शोध सुरू; मोठा मुलगा बचावला

कोल्हापूर : कणेरी येथील पोवार कॉलनीत भाड्याच्या खोलीत खेळणी विक्रेता विठ्ठल बाळासाहेब पाटील (वय ३७) आणि त्यांचा मुलगा वेदांश (वय ४) यांचे गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले. दोन्ही मृतदेहांवर रविवारी (दि. २१) पाटील यांच्या मूळ गावी चिक्कोडी (जि. बेळगाव) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी (दि. २०) दुपारी घडलेल्या घटनेत पाटील यांचा मोठा मुलगा सुदैवाने बचावला. दरम्यान, पोटच्या मुलाला फासाला लटकवून विठ्ठल यांनी गळफास घेण्याचे कारण काय असावे, याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मूळचा विठ्ठल पाटील हा गोकुळ शिरगाव येथील औद्योगिक वसाहतीत काम करीत होता. शिवाजी पेठेतील चंद्रेश्वर गल्लीत त्याच्या पत्नीचे माहेर होते. पत्नी क्रांती, पाच वर्षांचा मुलगा विक्रांत, तीन वर्षांचा वेदांश आणि विठ्ठल असे चौघांचे कुटुंब कणेरी येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. तिरुपती बालाजी येथे देवदर्शन करून परतलेले पाटील कुटुंब क्रांती यांच्या माहेरी शिवाजी पेठेत गेले होते.शनिवारी सकाळी दोन्ही मुलांना घेऊन विठ्ठल हे रंकाळ्यावर जातो असे सांगून घरातून बाहेर पडले. मात्र, ते थेट कणेरी येथील घरी गेले. दोन्ही मुलांना झोपवून त्यांनी छताच्या लोखंडी पाइपला दोरीने तीन फास बांधले. एका फासात लहान मुलाला लटकवले. त्यानंतर दुसऱ्या दोरीने स्वत: गळफास घेतला. काही वेळाने मोठा मुलगा विक्रांत हा उठल्यानंतर त्याला वडील आणि भाऊ वेदांश हे दोघे लटकलेल्या अवस्थेत दिसले. त्याने वडिलांच्या मोबाइलवरून आईला फोन करून हा प्रकार सांगितला. क्रांती यांनी माहेरच्या नातेवाइकांना कणेरी येथे पाठवल्यानंतर वडिलांनी मुलासह गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.गोकुळ शिरगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सीपीआरमध्ये पाठवले. उत्तरीय तपासणीनंतर रविवारी पाटील यांच्या मूळ गावी चिक्कोडी येथे दोन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पती आणि मुलाच्या दुर्दैवी मृत्यूने क्रांती आणि त्यांच्या नातेवाइकांना धक्का बसला.

कारणांचा शोध सुरूविठ्ठल हा काही वर्षे गोकुळ शिरगाव येथील औद्योगिक वसाहतीत काम करीत होता. त्यानंतर त्याने यात्रा, जत्रा आणि आठवडी बाजारांमध्ये खेळणी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. आर्थिक अडचणीतून त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अन्य कारणांचाही शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस