शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या धडकेत बाप-लेकाचा मृत्यू, नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी जाताना काळाचा घाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 12:22 IST

इचलकरंजी : येथील डेक्कन चौक परिसरात ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोडणारी पिन निघाल्याने ट्रॉलीची धडक बसून मोपेडस्वार बाप-लेकाचा मृत्यू झाला. आनंदा सोपान ...

इचलकरंजी : येथील डेक्कन चौक परिसरात ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोडणारी पिन निघाल्याने ट्रॉलीची धडक बसून मोपेडस्वार बाप-लेकाचा मृत्यू झाला. आनंदा सोपान गणपते (वय ५५) व विकास आनंदा गणपते (३०, दोघे रा. घोडकेनगर, संग्राम चौक इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. हा अपघात गुरुवारी (दि.२२) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास झाला. याबाबत मध्यरात्री शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गणपते पिता-पुत्र कोरोची (ता.हातकणंगले) येथे नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी मोपेड (एमएच ०९ ईवाय ७५९४) वरून गुरुवारी रात्री निघाले होते. त्याचवेळी पंचगंगा साखर कारखान्याकडून इचलकरंजीकडे मोकळी ट्रॅक्टर-ट्रॉली (केए २३ टीडी ६३२९) येत होती. डेक्कन चौक परिसरात एका दारू दुकानासमोर अचानक ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोडणारी पिन निघाली. त्यामुळे पाठीमागील ट्रॉली निखळून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघालेल्या गणपते पिता-पुत्राच्या मोपेडवर आदळली.

जोराची धडक बसल्याने मोपेडसह दोघेही रस्त्यावर आपटले. त्यामध्ये विकास याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला, तर आनंदा हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना आयजीएम रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.दोघांच्या पार्थिवावर येथील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आनंदा हे यंत्रमाग कामगार होते, तर विकास याचा वाहनांच्या स्पेअर पार्ट विक्रीचा व्यवसाय होता. विकास याच्या पश्चात आई, भाऊ, बहीण, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.दरम्यान, या अपघाताबाबत विकास याचे मेहुणे आशिष दिगंबर डांगरे (रा. इचलकरंजी) यांनी शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त केली आहे. मात्र, शुक्रवारी सायंकाळपर्यंत चालक सापडला नव्हता. याबाबतचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक नाथा गळवे हे करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीAccidentअपघातDeathमृत्यू