शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

नाल्यावरून जीवघेणा प्रवास

By admin | Updated: July 3, 2017 00:43 IST

खराशी नाल्यावर सुमारे ६.५० कोटी रुपयांचा पुल खासदार नाना पटोलेंच्या पुढाकाराने मंजूर झाला.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी कोल्हापूर शहरातील धान्य, इलेक्ट्रॉनिक्स, औषध, वाहने, सोने-चांदी, आदी क्षेत्रांतील बाजारपेठेत या कराची अंमलबजावणी कशी करायची, याबाबत साशंकता असल्याचे चित्र दिसून आले. काही मोठ्या कंपन्या, बडे व्यापारी, व्यावसायिकांनी ५ जुलैपर्यंत व्यवहारच न करण्याचे धोरण स्वीकारले आहे; त्यामुळे एकूणच बाजारपेठेत शांतता आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्या दिवशी एकत्रित करप्रणालीची कशी अंमलबजावणी करायची या चिंतेने अनेक व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकांना ग्रासले होते. त्यामुळे अनेकांनी कर सल्लागारांचा सल्ला घेतला. शनिवारी (दि. १) तसेच रविवारी सुटी असूनही अनेक कर सल्लागाराच्या कार्यालयात गर्दी होती. धान्य बाजार जीएसटी लागू होण्यापूर्वीपासूनच मंदावल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसांपासून कडधान्य, ज्वारीचे दर उतरले आहेत. त्यात काही व्यापाऱ्यांनी जीएसटी लागणाऱ्या ब्रँडेड डाळी, तांदूळ, आटा, आदी धान्य न घेण्याचा निर्णय घेतला आहे. काही बड्या व्यापाऱ्यांनी माल विकत घेणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना ‘जीएसटी’ क्रमांक काढण्याची गळ घातली आहे. त्यामुळे अनेक छोटे व्यापारी हे वीस लाखांच्या आतील उलाढाल करणारे आहेत. त्यामुळे जीएसटी क्रमांक काढणार नाही, अशा पवित्र्यात संबंधित छोटे व्यापारी आहेत. या परिस्थितीमुळे गेल्या दोन दिवसांपासून धान्य बाजार थंडावला आहे. इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमध्ये ‘जीएसटी’ची अंमलबजावणी होण्यापूर्वी तुडुंब गर्दीचे चित्र होते. मात्र, शनिवारी सकाळपासून ही दुकाने ओस पडली आहेत. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर यापूर्वी व्हॅटसह अन्य करांच्या रूपाने साधारणत: १७ टक्के कर लावला जात होता. मात्र, या ‘जीएसटी’ची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून तो २८ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे ग्राहकांना काहीशी पाठ फिरविली आहे. औषध दुकानांमध्ये नियमितपणे व्यवहार सुरू आहेत. मात्र, यात कराची अंमलबजावणी कोणत्या प्रकारे करायची याबाबत अजूनही साशंकता आहे. युनानी औषधे व आयुर्वेदिक औषधे असा फरक आहे. आयुर्वेदिक औषधांवर यापूर्वी सहा टक्के कर भरावा लागत होता. त्यात आता जीएसटीच्या रूपाने १२ टक्के कर भरावा लागणार आहे. त्यामुळे आयुर्वेदिक औषध दुकानदारांनी नाराजी व्यक्त केली आहे; तर युनानी औषध दुकानदारांमध्ये कर किती लावायचा याबद्दल शंका आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून जुन्या दराप्रमाणे व साठा उपलब्ध असेपर्यंत काहींनी आहे त्याच दराने मालविक्री करणे पसंत केले आहे. तर काहींनी स्टॉक मोजणीसाठी दुकाने बंद ठेवली आहे. सराफ बाजारही थंड आहे. बँकिंग सेवा दरातही शनिवारपासून वाढ झाली आहे. यात पूर्वी सेवाकर १५ टक्के होता. आता हाच ‘जीएसटी’मध्ये रूपांतरित झाल्याने १८ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे बँकिंगचा सेवाकर वाढला आहे. याबाबत राष्ट्रीयीकृत बँकांनी ग्राहकांना ३० जूनपूर्वीच जीएसटी लागू करण्याचा निर्णय एसएमएसद्वारे कळविला होता. त्यात प्रथम १५ टक्के कर लावला जाणार, अशी सूचना होती. मात्र, त्यात वाढ करत १८ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बँक ग्राहकांना आता १८ टक्के जीएसटी आपल्या खात्यावरील सेवेकरिता बँकेला द्यावे लागणार आहेत. १५ जुलैनंतर अधिक स्पष्टताकेंद्रीय व राज्य जीएसटी कार्यालयाकडून व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक यांच्यामध्ये जीएसटीसंदर्भात गेल्या महिन्याभरापासून जनजागृतीबाबत मेळावे, चर्चासत्रे घेतली जात आहेत. तरीही हा कर लागू झाल्यानंतर अनेक व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांसह सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था आहे, असे कर सल्लागार सुधीर अग्निहोत्री यांनी सांगितले. ते म्हणाले, यात ज्यांची उलाढाल १.५ कोटी आहे, अशा व्यापाऱ्यांना बिलावर एचएसएन कोड टाकावा लागणार आहे. त्यातही शेवटचे दोन आकडेच टाकायचे आहेत. त्यामुळे तो व्यापारी काय विकतो हे समजणार आहे. काही बारकाव्यांमुळे सर्वांमध्ये साशंकता आहे. उदा. म्हणून कोरोगेटेड बॉक्स हे पॅकिंगमध्ये आहे. त्याच्यावर किती टक्के कर लावायचा, हे स्पष्ट झालेले नाही. एकूणच जीएसटीबाबतचे चित्र १५ जुलैपर्यंत स्पष्ट होईल.औषधनिहाय कराच्या दरात बदलजीएसटीमुळे औषधांच्या दरामध्ये फारसा बदल होणार नाही. मात्र, औषधनिहाय कराचा दरात बदल आहेत. त्यानुसार संगणकप्रणालीत औषध आणि त्यांच्या कराचे दर नोंदविण्याचे काम औषध विक्रेत्यांना करावे लागणार आहे. त्यादृष्टीने त्यांची तयारी सुरू असल्याचे मदन पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, साधारणत: औषधांवरील कराचा दर १२ ते १८ टक्क्यांपर्यंत जाणार आहे. मात्र, त्याचा किंमतीवर परिणाम होणार नाही.‘जीएसटी भवन’मध्ये मदत कक्ष‘जीएसटी भवन’मध्ये व्यापारी, व्यावसायिकांच्या मार्गदर्शनासाठी मदत कक्ष कार्यान्वित आहे. या कराबाबत काही माहिती अथवा त्याच्या अंमलबजावणीसाठी काही अडचण असल्यास संबंधित व्यापारी, व्यावसायिकांनी त्या प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनी अथवा ई-मेलद्वारे या कक्षात सादर कराव्यात. याबाबत आवश्यक ते मार्गदर्शन, मदत केली जाईल, असे वस्तू व सेवाकर कोल्हापूर विभागाचे उपआयुक्त सचिन जोशी यांनी सांगितले.हॉटेल क्षेत्रात नाराजीहॉटेल, रेस्टॉरंट, लॉजिंग या सेवाक्षेत्रात ‘जीएसटी’मुळे करवाढ झाली असल्याने हॉटेल व्यावसायिक, ग्राहकांमध्ये नाराजी असल्याचे कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे माजी अध्यक्ष आनंद माने यांनी सांगितले. ते म्हणाले, पूर्वी हॉटेलिंग व्यवसायाला पाच टक्क्यांपर्यंत कर लागत होता. आता १२ ते १८ टक्क्यांपर्यंत तो जाणार आहे. हॉटेलमधील एसी आणि नॉन एसीला वेगळा टॅक्स लागणार आहे. त्याचा भार साहजिकच ग्राहकांवर पडणार आहे. त्यामुळे एकूणच या क्षेत्रात नाराजीचे चित्र आहे.