शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ओल्या दुष्काळाचे सावट आतापर्यंत १५ हजार मिलिमीटर पाऊस : पिके आकसल्याने शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:33 IST

पाऊस थांबण्याचे नावच घेत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आतापर्यंत जिल्ह्णात तब्बल १५ हजार २१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीच्या ७२ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ५२७ मिलिमीटर पाऊस अधिक झाला.

कोल्हापूर : पाऊस थांबण्याचे नावच घेत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आतापर्यंत जिल्ह्णात तब्बल १५ हजार २१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीच्या ७२ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ५२७ मिलिमीटर पाऊस अधिक झाला. सततच्या पावसाने खरीप पिके आकसली असून जिल्ह्णावर ओल्या दुष्काळाचे सावट पसरले आहे.

आपल्याकडे मान्सूनच्या चार महिन्यांत १५ दिवस जोरदार पाऊस, त्यानंतर आठ - दहा दिवस उघडझाप अशीच परिस्थिती राहते. जुलै महिन्यात पावसाचा जोर राहतो, त्यानंतर हळूहळू जोर कमी येतो. श्रावण महिन्यात तर ऊन-पावसाचा खेळ पाहावयास मिळतो. अशा प्रकारचा पाऊस पिकांना पोषक असतो. पिकांना सूर्यप्रकाश मिळाला नाही, तर त्याच्या वाढीवर परिणाम होतो. यंदा जिल्ह्णात जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेला पाऊस एकसारखा सुरू आहे. ‘मृग’ नक्षत्रापासून पाऊस झोडपत असून, पुढचे नक्षत्र उघडेल, त्या पुढच्या नक्षत्रात पाऊस कमी होईल, अशी अटकळ शेतकºयांनी बांधली; पण अडीच महिने पाऊस थांबण्याचे नावच घेत नाही. त्याचा सर्वाधिक फटका पिकांना बसला आहे. जमिनीत वापसाच नसल्याने वाढ खुंटली आहे. गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी या तालुक्यात तर अतिवृष्टीमुळे उसाच्या पानांच्या चिंध्या उडाल्या आहेत. सूर्यप्रकाश नाही, त्यात पाने फाटल्याने अन्न निर्मितीच थांबल्याने ऊस खाली बसले आहेत.

गेल्यावर्षी १७ आॅगस्टपर्यंत जिल्ह्णात ९ हजार ९३७ मिलिमीटर पाऊस झाला होता, या वर्षी १५ हजार २१५ मिलिमीटरची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा तब्बल ५ हजार २७८ मिलिमीटर जादा पाऊस झाला आहे. अडीच महिन्यांत वार्षिक सरासरीच्या ७२ टक्के पाऊस झाला. नदीकाठावरील ऊस पाण्याखाली गेल्याने ते संपले आहेत. उर्वरित ठिकाणी अतिवृष्टी आणि किडीच्या प्रादुर्भावाने ऊस, भातासह इतर पिके अडचणीत आली आहेत; त्यामुळे जिल्ह्णावर ओल्या दुष्काळाचे संकट पसरले असून, असाच पाऊस आणखी १५ दिवस राहिला, तर दुष्काळाचे संकट अधिक गडद होणार, हे मात्र निश्चित आहे.

तीन तालुक्यांनी वार्षिक सरासरी ओलांडलीशाहूवाडी, कागल व भुदरगड तालुक्याने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. विशेष म्हणजे गतवर्षी १७ आॅगस्टपर्यंत एकाही तालुक्याने सरासरी ओलांडली नव्हती.माणसाबरोबर जनावरेही कैंगाटलीएकसारख्या पावसाने माणसे वैतागून गेले आहेत; पण त्याबरोबर जनावरेही आता कैंगाटली आहेत. पावसामुळे अंगातील गारठा जात नसल्याने दूध उत्पादनावरही परिणाम झाला आहे.सव्वादोन कोटींचे नुकसानगेल्या वर्षी आतापर्यंत १९७ मालमत्तांची पडझड होऊन ४० लाख १७ हजारांचे नुकसान झाले होते; पण यंदा तब्बल २ कोटी ३२ लाखांचे नुकसान झाले आहे.