शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील रस्ते काम कोल्हापुरात शेतकऱ्यांनी रोखले, तासभर ठिय्या 

By संदीप आडनाईक | Updated: June 1, 2024 19:18 IST

महामार्गाच्या वतीने जलवाहिन्या बसवून द्याव्यात

कोल्हापूर : शिये, भुये परिसरातील आठ गावातील महामार्गात येणाऱ्या उपसा सिंचन योजनेच्या जलवाहिन्या नेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याखालून जलवाहिन्या बसवून द्याव्यात या मागणीसाठी शिये येथे तब्बल दीडशे शेतकऱ्यांनी शनिवारी सकाळी भारतीय किसान संघाच्या नेतृत्वाखाली नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील रस्ते काम रोखून धरले. अधिकाऱ्यांनी जलवाहिन्या बसवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.नागपूर-रत्नागिरी महामार्ग हा करवीर तालुक्यातील शिये, भुये, भुयेवाडी, जठारवाडी, निगवे दुमाला, केर्ले, केर्ली, पडवळवाडी या आठ गावातून जातो. हा रस्ता क्रॉस करण्यासाठी येथील शेतकऱ्यांच्या जलवाहिन्या प्रत्येकी अर्धा किलोमीटर अंतरावर महामार्ग प्राधिकरणाकडून ब्लँक टाकण्यात येणार आहेत. याला शेतकर्‍यांनी आक्षेप घेतला होता. यासंदर्भात राहुल रेखावार जिल्हाधिकारी असताना त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी झालेल्या त्रुटी समजून घेउन हा पाईपलाईन टाकून देण्याचा निर्णयही घेतला होता, मात्र नवीन जिल्हाधिकारी येताच प्राधिकरणाने जुनेच कागदपत्रे दाखवून आपल्या सोयीचा निर्णय घेतला.त्यामुळे प्राधिकरणाने एका दिवसात हालचाल करुन शेतकरी शेतात असताना या पाईप उखडण्यास सुरुवात केली. या शेतकऱ्यांना ही माहिती समजताच त्यांनी शेतातील कामे सोडून तत्काळ घटनास्थळी धाव घेत रास्ता रोको आंदोलन केले. ज्या ठिकाणी पाईप आहेत, त्याच ठिकाणी महामार्गाच्या वतीने पाईप क्रॉसिंग करुन मिळाव्यात अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. 

दरम्यान, प्रत्येक अर्धा किलोमीटर अंतरावर ब्लँक ठेवल्यास त्यातील त्रुटी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत महामार्ग प्रकल्प संचालक व्ही. डी. पंदरकर यांनाही शेतकऱ्यानी दाखवल्या होत्या. महामार्ग विभागाने शेतकऱ्यांना आहे तिथेच पाईपलाईन बसून द्यावी असे या बैठकीत ठरले होते, पण येथील कंत्राटदार शेतकऱ्यांना पाईपलाईन तुम्ही स्वतःच्या खर्चाने करा असे सांगत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शनिवारी महामार्गावरील कामकाज शेतकऱ्यांनी बंद पाडले.या आंदोलनात भारतीय किसान संघ जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ शिंदे, करवीर तालुका अध्यक्ष राजेश पाटील, दिलीप नाईक, लक्ष्मण पाटील, अमर पाटील, सर्जेराव निरुखे, अमर निरुखे, कृष्णात पाटील, भीमा खाडे, बाबासो गोसावी, नामदेव शिंदे, विकास पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गRatnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी