शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: धरणाची गळती काढायची हाय; जास्त ऊस लावू नका, पाटबंधारे प्रशासनाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 13:29 IST

कोल्हापूर : दूधगंगा धरणाची गळती काढण्यासाठी धरणातील पाणीसाठा आवश्यकतेनुसार कमी करण्यात येणार असल्याने कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये मर्यादित क्षेत्रावर उसाची लागवड ...

कोल्हापूर : दूधगंगा धरणाची गळती काढण्यासाठी धरणातील पाणीसाठा आवश्यकतेनुसार कमी करण्यात येणार असल्याने कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये मर्यादित क्षेत्रावर उसाची लागवड करावी, असे आवाहन पाटबंधारे प्रशासनातर्फे प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.पत्रकात म्हटले आहे, पाटबंधारे मंडळ उत्तर विभागातर्फे दूधगंगा धरणाची गळती काढण्याच्या कामास यावर्षी सुरूवात करणार आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा आवश्यकतेनुसार कमी करण्यात येणार आहे. रब्बी व उन्हाळी हंगामासाठी आवश्यक पाणीसाठा धरणामध्ये ठेवण्यात येणार आहे. मात्र, या दोन्ही हंगामांसाठी पाण्याची गरज कमी असलेल्या पिकांची निवड करण्यात यावी. धरणाची एकूण पाणी साठवण्याची क्षमता २५.४० टीएमसी आहे. गेल्यावर्षी दूधगंगा धरणाच्या गळतीमुळे २०.५४ टीएमसी पाणीसाठा करण्यात आला होता. या पावसाळ्यात पाऊस कमी झाला आहे. जूनमध्ये पावसाने ओढ दिल्याने पाणीसाठा सिंचनासाठी अपुरा झाला. यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून धरणात एकूण पाणीसाठा २४.२२ टीएमसी व त्यातील उपयुक्त पाणीसाठा २२.८२ इतका करण्यात आला आहे. सध्या आवर्तन सुरू आहेत. सध्याचा एकूण पाणीसाठा २३.२५ टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा २१.८५ टीएमसी पाणीसाठा आहे.दरम्यान, दूधगंगा धरणाच्या गळती काढण्याच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. गळती प्रतिबंधक कामास यावर्षी सुरुवात करण्यात येणार आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा आवश्यकतेनुसार कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे दूधगंगा धरणाच्या कालव्याच्या लाभक्षेत्रात मर्यादित क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात यावी, तसेच मागील वर्षापेक्षा जास्त उसाची लागण करू नये, जेणेकरून आर्थिक नुकसान टाळणे शक्य होईल.

शेतकऱ्यांमध्ये संतापदूधगंगा कालव्याच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. चार पैसे मिळवून देणारे पीक असल्याने बहुतांशी शेतकरी उसाची लागवड करत आहेत. मात्र, पाटबंधारे विभागाने जास्त उसाची लागवड करू नका, असा अजब फतवा काढल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे. आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असताना धरणातील पाणी कमी करूनच गळती काढण्यासाठीच्या उपाययोजना करण्याची काय गरज आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यामुळे या प्रकरणावरून आगामी काळात पाटबंधारे प्रशासन आणि लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणFarmerशेतकरी