शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

Ratnagiri-Nagpur Highway: चौपट भरपाईसाठी शेतकऱ्यांचा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 15:48 IST

मोजणी रद्दचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे

हातकणंगले : रत्नागिरी–नागपूर मार्गावर मोजणी करण्यासाठी तालुका भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी अतिग्रे आणि मजले येथील ड्रोन मोजणीसाठी येण्याच्या अगोदरच, शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी तालुका भूमी अभिलेख कार्यालयाच्या दारावर ठिय्या आंदोलन सुरू केले. तहसीलदार सुशील बेलेकर आणि भूमी अभिलेखचे उपअधीक्षक जयदीप शितोळे यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकऱ्यांनी चौपट भरपाईचा निर्णय होईपर्यंत मोजणीला परवानगी देणार नाही असा इशारा कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी दिला. अखेर उपजिल्हाधिकारी रूपाली चौगुले यांनी घटनास्थळी धाव घेऊन शेतकऱ्यांची बैठक घेतली. चर्चेनंतर मोजणी रद्द केल्याचे सांगून आणि जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होईल असे आश्वासन दिल्याने शेतकरी शांत झाले.हातकणंगले तालुक्यातील चोकाक, अतिग्रे, माणगाववाडी, हातकणंगले, मजले या गावांतील चौपदरी महामार्गासाठी जमिनी मोजण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. यामुळेच शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी ९ वाजता हातकणंगले येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी आंदोलन थांबवण्याची विनंती केली, मात्र शेतकऱ्यांनी मोजणी थांबवली नाही तर उठणार नाही असा ठाम निर्धार केला. त्यानंतर तहसीलदार सुशील बेलेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन उपजिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. उपजिल्हाधिकारी रूपाली चौगुले यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील म्हणाले, महसूल मंत्र्यांच्या दालनात बैठक होऊन अद्याप चौपट भरपाईविषयी निर्णय झालेला नाही. प्रशासनाने बेकायदेशीर पद्धतीने मोजणी सुरू केली आहे. चौपट भरपाईचा निर्णय होईपर्यंत मोजणीला परवानगी देणार नाही. उपजिल्हाधिकारी चौगुले यांनी आजची मोजणी रद्द केल्याचे जाहीर करून लवकरच जिल्हाधिकारी यांच्या समक्ष बैठक होईल असे आश्वासन दिले.आंदोलनात डॉ. अभिजित इंगवले, सुरेश खोत, किरण जामदार, अमित पाटील, दीपक वाडकर, अविनाश कोडोले, सुधाकर पाटील, मिलिंद्र चौगुले, प्रतीक मुसळे, शिलवंत बिडकर, आनंदा पाटील, जयकुमार दुघे, सचिन मगदूम, अजित रणनवरे उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers protest at land records office for Ratnagiri-Nagpur highway compensation.

Web Summary : Farmers protested at the Land Records office demanding fourfold compensation for land acquired for the Ratnagiri-Nagpur highway. Officials intervened, promising a meeting with the Collector, leading to the protest being called off and a cancellation of the land measurement.