शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शेताकडे जाताना दबा धरुन बसलेल्या गव्याचा हल्ला, शेतकरी जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 15:47 IST

जिल्ह्यात गव्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या

धामोड : कुदळवाडी येथील शेतकरी भिकाजी गुंडू बेरकळ हे शेताकडे गेले असता दबा धरून बसलेल्या गव्याने जोरदार धडक दिल्याने ते जागीच ठार झाले. ही धडक इतकी जोराची होती की अवघ्या काही मिनिटातच उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.८) घडली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ धाव घेत पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मुक्तदेह पुढे पाठवला.आपटाळ पैकी कुदळवाडी (ता राधानगरी) येथील भिकाजी गुंडू बेरकळ (वय ६५) हे शेतीच्या कामासाठी व पिकांना पाणी देण्यासाठी आपल्या शेताकडे चालले होते. दरम्यान कडक नावाच्या शेताजवळ येताच, या ठिकाणी दबा धरून बसलेल्या गव्याने त्यांच्यावर हल्ला केला. गव्याने दिलेली धडक इतकी जोरदार होती की, गव्याची शिंगे त्यांच्या उजव्या बाजूच्या बरगडीत घुसली. छातीवर जोरदार धडक बसल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. व अवघ्या काही मिनिटातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.

वाचा- भिकूआबा, आम्हासनी आता पाणी आल्याचे कोण सांगणारघटनेची फिर्याद गावचे पोलीस पाटील बाळासो पाटील यांनी राधानगरी पोलीस ठाणे व वनविभाग राधानगरी यांना दिली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, राधानगरीकडे पाठविला.

मृतांची संख्या सर्वाधिकजिल्ह्यात गव्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. गव्यांनी काही ठिकाणी शेतकरी आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आहे, ज्यात काहीजण जखमी झाले आहेत तर काहीजणांचा मृत्यूही झाला आहे. जिल्ह्यात गत तीन वर्षांत झालेल्या हल्ल्यांमध्ये गव्यांच्या हल्ल्यातील मृतांची संख्या ७ झाली आहे.गव्यांच्या हल्ल्यातील मृत्यू

  • २०१९-२० : ३
  • २०२१-२२ : २
  • २०२३-२४ : १
  • २०२४-२५ : १

तळगाव, आपटाळ, कुदळवाडी हा परिसर जंगलहद्दीला लागून येत असल्याने वन्यप्राण्यांपासून लोकांना होणारा त्रास या गावातील नवीन नाही. तरीही ग्रामस्थांनी काळजी घेऊन शिवारात जावे - संग्राम जितकर, वनपाल म्हासुर्ली 

शासन नियमाप्रमाणे मिळणारा मोबदला सदर पिडीत कुटुंबीयां पर्यंत लवकरात लवकर पोहचवण्यासाठी योग्य ते सहकार्य करू - विशाल पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी राधानगरी )

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभागradhanagari-acराधानगरीFarmerशेतकरीDeathमृत्यू