शेतीतज्ञ अशोक बंग यांना सा. रे.पाटील समाजभूषण पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 11:57 IST2020-03-06T11:54:54+5:302020-03-06T11:57:15+5:30

शिरोळ येथील श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे.पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार वर्धा येथील पर्यायी कृषी संसाधन केंद्र चेतना विकासचे संचालक व शेतीतज्ञ अशोक बंग यांना जाहीर झाला आहे.

Farmer Ashok Bang Rev. Patil Samajbhushan award announced | शेतीतज्ञ अशोक बंग यांना सा. रे.पाटील समाजभूषण पुरस्कार जाहीर

शेतीतज्ञ अशोक बंग यांना सा. रे.पाटील समाजभूषण पुरस्कार जाहीर

ठळक मुद्देशेतीतज्ञ अशोक बंग यांना सा. रे.पाटील समाजभूषण पुरस्कार जाहीरशिरोळ येथे १ एप्रिलला पुरस्काराचे वितरण

शिरोळ : शिरोळ येथील श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे.पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार वर्धा येथील पर्यायी कृषी संसाधन केंद्र चेतना विकासचे संचालक व शेतीतज्ञ अशोक बंग यांना जाहीर झाला आहे.

१ एप्रिलला शिरोळ येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे. एक लाख एक हजार एकशे एक रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

माजी राज्यपाल,खासदार श्रीनिवास पाटील यांच्याहस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती श्री दत्त उद्योग समुहाचे प्रमुख, उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष विनोद शिरसाठ यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

Web Title: Farmer Ashok Bang Rev. Patil Samajbhushan award announced