इचलकरंजीत अतिक्रमण कारवाईचा फार्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:22 IST2020-12-24T04:22:03+5:302020-12-24T04:22:03+5:30
(फोटो) लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने मंगळवारी अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवून कारवाईचा फार्स केला. मुख्य ...

इचलकरंजीत अतिक्रमण कारवाईचा फार्स
(फोटो)
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने मंगळवारी अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवून कारवाईचा फार्स केला. मुख्य मार्गावरील तीन खाद्यपदार्थांच्या गाड्या व सोळा दुकानांचे बोर्ड जप्त केले. त्यामुळे या कारवाईचे स्वागत होण्याऐवजी नाराजीच व्यक्त होत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात कारवाईची मागणी होत आहे.
शहरातील अतिक्रमणाविषयी ''''लोकमत''''ने मालिका देऊन त्यावर प्रकाशझोत टाकला. नगरपालिकेकडून संबंधितांवर कारवाई करून जरब बसविणे आवश्यक होते; परंतु मंगळवारी कोल्हापूर नाका ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावर जुजबी कारवाई करण्यात आली. यावरून नगरपालिकेचे व संबंधितांचे दृढ ''''संबंध'''' निर्माण झाले आहेत की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
(फोटो ओळी)
२२१२२०२०-आयसीएच-१२
इचलकरंजीत मुख्य मार्गावरील फुटपाथवर झालेले अतिक्रमण नगरपालिकेच्या पथकाने काढले.
(छाया - उत्तम पाटील)