अणदूर, मांडुकली,वेतवडे बंधारे पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 17:39 IST2021-06-17T17:25:55+5:302021-06-17T17:39:38+5:30
Rain Kolhapur : गेल्या दोन दिवसा पासून कोसळणाऱ्या पावसात साळवन परिसरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून बुधवार पासून दिवसरात्र मुसळधार पाऊस सुरुच आहे.परिणामी अणदूर, मांडुकली, वेतवडे ता.गगनबावडा हे बंधारे पाण्याखाली गेले असून मांडुकली,खोपडेवाडी,अणदूर, वेतवडे,टेकवाडी, बालेवाडी,रानेवाडी आदी नदीच्या तिरावरील गावांचा संपर्क तुटला आहे.

कोल्हापूर- गगनबावडा मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.
साळवन : गेल्या दोन दिवसा पासून कोसळणाऱ्या पावसात साळवन परिसरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून बुधवार पासून दिवसरात्र मुसळधार पाऊस सुरुच आहे.परिणामी अणदूर, मांडुकली, वेतवडे ता.गगनबावडा हे बंधारे पाण्याखाली गेले असून मांडुकली,खोपडेवाडी,अणदूर, वेतवडे,टेकवाडी, बालेवाडी,रानेवाडी आदी नदीच्या तिरावरील गावांचा संपर्क तुटला आहे.
मांडुकली येथे मुख्य रस्त्यावर कोसळले झाड
कोल्हापूर ते गगनबावडा मुख्य मार्गावर मांडुकली पैकी पडवळवाडी या ठिकाणी रस्त्यावर आंब्याचे मोठे झाड अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे कोसळले असून त्यामुळे काही काळासाठी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.
वाहतुकीस अडथळा निर्माण झालेला आहे. त्यामुळे काही काळासाठी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.मांडुकली पैकी पडवळ वाडी येथील पोलीस पाटील यांनी परिसरातील लोक व ट्रॅक्टर यांच्या मदतीने झाड बाजूला करून काही काळानंतर वाहतूक सुरळित करण्यात आली.