शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

कौमार्य चाचणीत अपयशी, दोघी बहीणींना पाठवले कोल्हापूरात माहेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 21:14 IST

Crime news Kolhapur-कौमार्य परिक्षेत अपयशी ठरल्याने दोन सख्ख्या बहीणींना विवाहनंतर अवघ्या तिसर्या दिवशी कोल्हापूरात माहेरी पाठवल्याची धक्कादायक घटना घडली. समाजाच्या जातपंचायतीनेही निर्णय देताना त्या मुलींना काडीमोड झाल्याचा आदेश दिल्याने दोन्ही पीडित मुलींवर आभाळ कोसळले.

ठळक मुद्देकौमार्य चाचणीत अपयशी, दोघी बहीणींना पाठवले कोल्हापूरात माहेरी धक्कादायक प्रकार : बेळगाव येथील दोघा भावांसह चौघांवर गुन्हा

कोल्हापूर : कौमार्य परिक्षेत अपयशी ठरल्याने दोन सख्ख्या बहीणींना विवाहनंतर अवघ्या तिसर्या दिवशी कोल्हापूरात माहेरी पाठवल्याची धक्कादायक घटना घडली. समाजाच्या जातपंचायतीनेही निर्णय देताना त्या मुलींना काडीमोड झाल्याचा आदेश दिल्याने दोन्ही पीडित मुलींवर आभाळ कोसळले.

कोल्हापूरातील उपनगरात राहणार्या कंजारभाट समाजातील दोघी बहिणींनी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचा आधार घेत राजारामपूरी पोलीस ठाण्यात बेळगाव येथील संदीप सनी गागडे व सुरजीत गागडे या दोघा सख्ख्या भावांसह चौघांवर तक्रार दिली. माणुसकिला काळीमा फासणारा या प्रकाराबद्दल संतापाची लाट उमटत आहे.कोल्हापुरातील उपनगरात राहणाऱ्या कंजारभाट समाजातील एका कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणींचा विवाह बेळगाव (कर्नाटक) येथील हनुमान नगरातील संदीप व सुरजीत गागडे यांच्यासोबत दि. २७ नोव्हेंबर २०२० ला झाला होता. दोन्ही कुटूंबिय एकाच समाजातील असल्याने त्यांच्यात कोमार्य चाचणीची पद्धत आहे. त्यानुसार या दोन्ही मुलींची परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये एक मुलगी अपयशी ठरली.

घटनेनंतर संबंधित दोन्ही मुलींच्या चारित्र्यावर संशय घेत सासरच्या लोकांकडून त्यांच शारीरिक आणि मानसिक शोषण सुरू झाले. लग्नांनतर तीन दिवस या मुलींशी त्या पतींनी त्यांच्याशी शारिरीक संबधही ठेवले. त्यांनंतर त्यांनी त्या दोघींना घरातून हाकलून काढून कोल्हापूरात माहेरी पाठवले. मुलींच्या नातेवाईकांनी संबध जुळवण्यासाठी प्रयत्न केले, पण त्यात अपयश आले.दरम्यान दि. ३ फेब्रुवारीला दोन्ही मुलींना व त्याच्या आईला कोल्हापुरात शाहू टोल नाक्यानजीकच्या एका मंदीरात बोलावून घेतले. तिथं जात पंचायत बसवली. पंचायतीने त्या दोन मुलींना काडीमोड झाल्याचा निर्णय दिला. तसेच दोन्ही मुले आणि मुलींना समाजातील विवाह इच्छुकांची विवाह करण्याचे स्वातंत्र असल्याचही स्पष्ट केले. पंचयतीने अचानक दिलेल्या या निर्णयान पीडित मुलींच्यावर आभाळ कोसळले.घटनेनंतर पिडीत मुलींनी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मलन समितकडे रितसर अर्ज केला. त्यानुसार गुरुवारी राजारामपूरी पोलीस ठाण्यात संदीप गागडे, सुरजीत गागडे या दोघा भावांसह शोभा सनी गागडे, इश्वर गागडे यांच्याविरोधात तक्रार दिली. घटनेनंतर पीडित त्यांच्यावर तक्रार नोंदवण्याचे काम रात्री उशीरापर्यत सुरु होते.

पिडीत मुलींच्या कुटुंबियांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे रितसर लेखी दाद मागितली. त्यानुसार आम्ही पिडीत मुलींना घेऊन समितीच्या गीता हसुरकर, सीमा पाटील, रमेश वडणगेकर, सुजाता म्हेत्रे यांनी राजारामपूरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली- सुजाता म्हेत्रे (अंनिस पदाधिकारी)

बाभळीच्या काट्या अन काडीमोडशाहू टोल नाक्यानजीक मंदीरात जात पंचायतीने पिडीत मुली व संशयीत दोघा आरोपींसह त्यांची आई यांच्यासमोर बाभळीच्या पाच कांड्या समोर ठेवल्या. त्या एकमेकावर पाचवेळा मारुन त्या मुलींवरुन उतरुन दोन्ही बाजूला टाकल्या, झाले काडीमोड. असा जात पंचायतीचा नात्यातील काडीमोडची प्रथा असल्याचे पिडीतांनी सांगितले.

टॅग्स :WomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर