शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

‘महाराष्ट्र केसरी’साठी कागलकरांच्या अपेक्षा

By admin | Updated: December 19, 2014 00:20 IST

तालुक्यातील दोन मल्ल ठरले पात्र

म्हाकवे : अहमदनगर येथे होणाऱ्या आगामी ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेसाठी झालेल्या निवड चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील चारपैकी दोन मल्ल हे कागल तालुक्यातील आहेत. त्यामुळे शाहूकाळापासून कुस्ती पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या कागलकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पिंपळगाव बुद्रुक येथील कौतुक शामराव डाफळे व रणदिवेवाडी येथील महेश वरुटे या मल्लांचा समावेश आहे. पिंपळगाव बुद्रुकसारख्या छोट्या गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कौतुकने २०१० ते १२ यावर्षी झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक साधली होती. तसेच रेल्वेच्यावतीने दिल्ली येथे झालेल्या आॅल इंडिया रेल्वे कुस्ती स्पर्धेत त्याने रौप्यपदक, आंतरभारतीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत कांस्य व रौप्यपदक पटकावले होते. तसेच विविध कुस्ती मैदानांमध्ये हरियाणा, दिल्ली येथील मल्लांना अस्मान दाखवून कौतुकने आपली चमक दाखविली आहे. सध्या तो अर्जुन अवॉर्ड विजेते काका पवार, सेना केसरी गुंडाजी पाटील, वस्ताद तुकाराम चोपडे, उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील, आदींच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करीत आहेत. त्याला ‘शाहू’ कारखान्याचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे, जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाचे सहकार्य लाभले आहे.महेश वरुटे रणदिवेवाडी या खेड्यातला. त्यानेही राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध पदके मिळविली आहेत. सध्या तो ‘रुस्तम-ए-हिंद’ दादू चौगुले यांच्याकडून कुस्तीेचे धडे घेत आहे. कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीत महेश सराव करतो. (वार्ताहर)