शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Kolhapur: सतेज पाटील यांच्याकडून अपेक्षा वाढल्या!; गडहिंग्लज विभागात नावालाच काँग्रेस, तरीही लोकसभेला भरभरून मते

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 15:58 IST

हे आहेत कळीचे प्रश्न !

राम मगदूमगडहिंग्लज : गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यात काँग्रेस पक्ष सध्या नावालाच आहे. तरीही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांना गडहिंग्लज विभागाने भरभरून मते दिली. त्यामुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्याकडून या विभागाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.शेकाप, जनता दलाचा अपवाद वगळता या विभागाचे नेतृत्व काँग्रेस / राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे दीर्घकाळ राहिले. व्ही. के. चव्हाण-पाटील, नरसिंगराव पाटील, डॉ. एस. एस. घाळी, बळीराम देसाई, बाबासाहेब कुपेकर, श्रीपतराव शिंदे यांचा दबदबा राज्यभर होता. परंतु, त्यांच्यानंतर तीनही तालुक्यात सर्वसमावेशक नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. म्हणूनच, सर्वसामान्य जनतेने मोठ्या आशेने पुन्हा काँग्रेसची कास धरली आहे.स्वातंत्र्यानंतर साखर कारखाना, तालुकासंघ, बाजार समिती, सूतगिरणी आदींच्या माध्यमातून डोंगराळ भागाचा कायापालट करण्याचे स्वप्न काँग्रेसच्या पहिल्या पिढीतील नेत्यांनी पाहिले. परंतु, सुरुवातीचे भरभराटीचे दशक वगळता त्यांच्या हयातीतच या संस्थांना घरघर लागली, त्यांच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेला. म्हणूनच त्यात सकारात्मक हस्तक्षेप करण्यासाठी आमदार पाटील यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

पक्ष पुनर्बांधणीची गरजचंदगडमध्ये गोपाळराव पाटील, कल्लाप्पा भोगण, जे. बी. पाटील यांनी नव्या उमेदीने काँग्रेसची पताका खांद्यावर घेतली आहे. आजऱ्यात जयवंतराव शिंपी, उमेश आपटे पुन्हा सक्रिय झाले आहेत. गडहिंग्लजमध्ये अप्पी पाटील यांच्या रूपाने तालुक्यात आणि स्वाती कोरी यांच्यामुळे शहरात काँग्रेसला बळ मिळाले आहे. परंतु, नव्या उमेदीने गावपातळीवर पुढे आलेल्या महिला, तरुणांना पाठबळ देऊन पक्षाची पुनर्बांधणी करण्याची गरज आहे.

निष्ठावंतांना बळ द्यावे‘गोकुळ’ला दर्जेदार, सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या गडहिंग्लज विभागात अंजना रेडेकर या एकमेव संचालक आहेत. चंदगड-गडहिंग्लजला प्रतिनिधित्वच नाही. जिल्हा बँकेतील तीनही तालुक्यांतील संचालक हे राष्ट्रवादीचेच आहेत. त्यामुळे बँकेच्या स्वीकृत संचालकपदी काँग्रेसच्या येथील निष्ठावंताला संधी मिळाली. विद्याधर गुरबे, राजेंद्र परीट, संजय सावंत, नौशाद बुढेखान या कार्यकर्त्यांना बळ द्यावे.हे आहेत कळीचे प्रश्न !हिरण्यकेशी व घटप्रभा खोऱ्यातील पूरग्रस्तांचे पुर्नवसन, गडहिंग्लज व चंदगड तालुक्याच्या पूर्वभागाला हक्काचे पाणी, बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.काँग्रेसच्या विजयात भागीदारी !गेल्यावेळी संजय मंडलिकांना गडहिंग्लज विभागातून ५२ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. हे मताधिक्य तोडून ८,९३८ मतांची आघाडी शाहू महाराजांना दिली. म्हणजेच, त्यांच्या विजयात सुमारे ६० हजार मतांची भागीदारी ‘गडहिंग्लज’करांनी केली. त्याची उचित नोंद नेतृत्वाने व पक्षाने घ्यायला हवी.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलcongressकाँग्रेस