शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंदवाडमध्ये बाॅम्बसदृश वस्तूने शहरात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:23 IST

दरम्यान, ही वस्तू घेऊन येणार्‍या सांगलीच्या ५५ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस त्या व्यक्तीची कसून चौकशी करत ...

दरम्यान, ही वस्तू घेऊन येणार्‍या सांगलीच्या ५५ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस त्या व्यक्तीची कसून चौकशी करत आहेत. रात्री साडेअकराच्या सुमारास बाॅम्ब शोधक पथकाने बंदुकीतून गोळी झाडून बाॅम्बसदृश वस्तू निकामी केली अन् पोलिसांसह शहरवासीयांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री आठच्या सुमारास एक ५५ वर्षीय व्यक्ती हातात गुच्छसारखी वस्तू घेऊन थिएटर चौकातील महाडिक हाॅटेलजवळ रिक्षाने आली. ती हाॅटेलमालकाला शिवसेना तालुकाप्रमुख वैभव उगळे यांना गिफ्ट द्या असे सांगून जात असताना हाॅटेल मालकाला संशय आल्याने त्या व्यक्तीला थांबवून पोलिसांना बोलावून घेतले. गिफ्टमध्ये इलेक्ट्रिक वायर, घड्याळ दिसत असल्याने पोलिसांनी ती वस्तू तबक उद्यानात नेवून ठेवली व बाॅम्ब शोधक पथकाला पाचारण केले. रात्री साडेदहाच्या सुमारास बाॅम्ब शोधक पथक येऊन वस्तूची पाहणी केली. मात्र, नेमके अंदाज येत नसल्याने अखेर बंदुकीतून

गोळी झाडून बाॅम्बसदृश वस्तू निकामी केली.

घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुणी, पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

चौकट-

यंत्रणा वैतागली आहे

दत्तवाड, ता. शिरोळ येथील फेसबुकवरील आक्षेपार्ह मजकूर पोस्ट झाल्याने जिल्ह्यातील

पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. त्यामुळे येथील पोलीस ठाण्यातील

पोलिसांना चार दिवसांपासून झोप नाही. हे प्रकरण शांत होत असतानाच शहरात

बाॅम्ब सापडल्याने पोलीस यंत्रणा वैतागली आहे.