शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कारवाईला न जुमानता जोतिबा डोंगरावरील गायमुखाजवळ उत्खनन, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 14:13 IST

जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी, उत्खनानाचे पुरावे सादर

कोल्हापूर : जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी गायमुखाजवळ अनधिकृत गौणखनिज उत्खनन केल्याप्रकरणी हैदराबाद येथील मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा. प्रा. लि. कंपनी दंडात्मक कारवाईला न जुमानता रविवारी पुन्हा उत्खनन करीत होती. यासंबंधी पुराव्यानिशी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे कंपनीस उत्खनन बंद करण्याच्या सूचना दिल्या.कोल्हापूर - रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गासाठी गौणखनिजची आवश्यक आहे. यासाठी गायमुखाजवळ ठेकेदार कंपनी उत्खनन करीत आहे. जिल्हा खाणकाम योजनेत समाविष्ट असलेल्या गटातच कंपनी उत्खनन करीत आहे, असे पन्हाळा तहसील प्रशासनाने म्हणणे आहे. दरम्यान, ‘प्रजासत्ताक’चे अध्यक्ष देसाई यांनी यावर आक्षेप घेतला. बेसुमार आणि बेकायदेशीरपणे उत्खनन सुरू आहे. उत्खननाने डोंगर खचून जोतिबा मंदिरास धोका आहे, अशी तक्रार त्यांनी केली होती. त्याची दखल घेऊन तहसीलदार शिंदे यांनी तलाठीकरवी पंचनाम केला. यामध्ये १५० ब्रास माती, मुरूम गौणखनिज अनधिकृत उत्खनन केलेल्याचे स्पष्ट झाले.यामुळे कंपनीस ९ लाख १५ हजार रूपयांचा दंड भरून घेतला. दंड भरून कंपनी रविवारी त्याच ठिकाणी उत्खनन सुरू केले होते. तक्रारदार देसाई यांनी याचे फोटो, व्हिडीओसह जिल्हाधिकारी यांच्याकडे ई- मेलद्वारे तक्रार केली. कंपनीने उत्खनन करणे बंद केले आहे. यानिमित्ताने पन्हाळा तालुक्यातील बेकायदेशीर उत्खननचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.

प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या संगनमताने..प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या संगनमतामुळे गायमुखजवळ बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे. यामुळे शासनाचे नुकसान होत आहे, अशी तक्रार देसाई यांनी केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. उत्खननप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल, तरीही उत्खननदेसाई यांनी पहिल्यांदा तक्रार केल्यानंतर १० डिसेंबर रोजी प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दखल घेऊन कार्यवाहीचा अहवाल आठ दिवसांत अहवाल देण्याचा आदेश प्रांताधिकारी, तहसीलदार यांना दिले. यानंतर ११ डिसेंबर रोजी तहसीलदार शिंदे यांनी उत्खनन करणाऱ्या कंपनीस दंड करून अहवाल पाठवला. प्रशासनाच्या या दंडात्मक कारवाईला केराची टोपली दाखवत कंपनी रविवारी उत्खननाचे धाडस केले, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी गौणखनिज उत्खननप्रकरणी दोषी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा. प्रा. लि. कंपनीस दंडात्मक कारवाई केली आहे. तरीही, या कंपनीकडून रविवारी उत्खनन होत असल्याची तक्रारी झाली. त्यानंतर तातडीने उत्खनन बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कंपनीने पुन्हा उत्खनन केल्याने त्यांच्यावर कारवाई होईल. - माधवी शिंदे, तहसीलदार, पन्हाळा.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी