शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: पूरपरिस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित

By संताजी मिठारी | Updated: August 10, 2022 16:19 IST

विविध ६१ अभ्यासक्रमांच्या ४१ हजार ५४२ विद्यार्थ्यांची परीक्षा लांबणीवर पडणार आहे.

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने आज बुधवार आणि उद्या गुरूवार (दि.११) च्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विविध ६१ अभ्यासक्रमांच्या ४१ हजार ५४२ विद्यार्थ्यांची परीक्षा लांबणीवर पडणार आहे.गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येण्यास आणि जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. काही भागामध्ये वीजेचा पुरवठा खंडीत होत आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अडथळा येत आहे. सलग पाऊस सुरू असल्याने या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेवून विद्यापीठाने आज बुधवार, उद्या गुरूवार रोजी होणाऱ्या बी. कॉम., बी. ए., एम. ए., एम. कॉम., बी. व्होक, आदी अभ्यासक्रमांच्या परीक्षा स्थगित केल्या.या परीक्षांचे नवीन वेळापत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर लवकरच जाहीर केले जाईल, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKolhapur Floodकोल्हापूर पूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठexamपरीक्षा