शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात जोरदार राडा! खैबर-पख्तूनख्वाच्या मुख्यमंत्र्यांना पोलिसांनी लाथा-बुक्क्यांनी मारले; इम्रान खान मृत्यू प्रकरण...
2
स्मृति मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न कधी होणार? आई अमिता मुच्छल यांनी दिली मोठी अपडेट
3
रिलायन्स इंडस्ट्रीजला ५६.४४ कोटी रुपयांची जीएसटी नोटीस, पाहा काय आहे प्रकरण?
4
Maharashtra Crime: प्रचार करत असतानाच भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; अनिकेत नाकाडेंसोबत काय घडलं?
5
AI च्या मदतीने बनवला एसी लोकल पास, अंबरनाथमधील इंजिनिअर पती- उच्चशिक्षित पत्नीला अटक; दोघे कसे अडकले?
6
Elephant Attack: स्कूटरवरून खेचलं, सोंडेनं उचलून जमिनीवर आपटलं, मग...; हत्तीच्या हल्ल्यात मुलगा ठार
7
संतापजनक! १५ एप्रिल रोजी कोर्ट मॅरेज,२२ नोव्हेंबरला पत्नीची हत्या; नेमके प्रकरण काय?
8
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार होणार, स्थगिती नाही: सुप्रीम कोर्ट
9
फायरिंगचा शौक! कपिल शर्मा कॅफे गोळीबार प्रकरणात अटक केलेला बंधू मान सिंह आहे तरी कोण?
10
'सहारा'त अडकलेले कोट्यवधी रुपये परत मिळणार! 'हे' ठेवीदार ऑनलाइन करू शकतात अर्ज
11
"ते जिवंत असल्याचा कोणता पुरावाही नाहीये"; इम्रान खानचा मुलगा झाला भावूक, पाकिस्तान सरकारवर गंभीर आरोप
12
Black Friday Sale 2025: ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये ६५% पर्यंत स्वस्तात मिळताहेत TV-फ्रिज; पाहा ऑफर आणि किंमत
13
निधनापूर्वी धर्मेंद्र यांनी पाहिला होता हा चित्रपट, आमिर खानचा खुलासा, म्हणाला - 'ती स्क्रिप्ट त्यांना...'
14
लिव्ह-इन पार्टनरची गळा दाबून केली हत्या, मृतदेह कारमध्ये नेऊन ठेवला आणि झोपी गेला; दारूमुळे...
15
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
16
December Born Astro: डिसेंबरकर दिसायला आकर्षक, पण आळशीपणामुळे गमावतात अनेक संधी!
17
रतन टाटांच्या मृत्युपत्रात सातासमुद्रापलीकडील व्हिला; खरेदीसाठी कोण इच्छुक? पैसे कोणाला मिळणार?
18
Crime: लैंगिक अत्याचार, नंतर जबरदस्तीने गर्भपात; काँग्रेसच्या आमदाराविरोधात गुन्हा दाखल!
19
नगराध्यक्षांसह ८ नगरसेवकांनी 'धनुष्यबाण' हाती घेतलं; शिंदेसेनेचा अजित पवार गटाला दे धक्का
20
Maithili Thakur : "मी व्हेकेशन, आराम विसरली, मला फक्त..."; आमदार होताच जोरदार कामाला लागल्या मैथिली ठाकूर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur-TET Paper leak case: तपासात परीक्षा परिषदेचे असहकार्य, पोलिसांचा अनुभव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 11:42 IST

परीक्षा परिषदेकडून सहकार्याची अपेक्षा

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा कारभार पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. टीईटी पेपर फुटीप्रकरणी चौकशीला गेलेल्या तपास पथकाला परीक्षा परिषदेने गोपनीय माहिती देण्यास नकार दिल्याचे कोल्हापूरपोलिसांनी सांगितले. असहकार्यामुळे परीक्षा परिषदेच्या कारभाराबद्दल संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. दरम्यान, याबाबत परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांना विचारणा केली असता, त्यांनी वरिष्ठांची बैठक घेऊन निर्णय घेतला जात आहे, अशी माहिती दिली.टीईटी परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीतील टोळीला अटक केल्यानंतर पोलिसांचा तपास परीक्षा परिषदेकडे वळला. मुरगुड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी करे यांचे पथक बुधवारी पुणे येथील परीक्षा परिषदेच्या कार्यालयात पोहोचले. परीक्षेचे आयोजन करण्याची जबाबदारी दिलेल्या संस्थेचे नाव, प्रश्नपत्रिका तयार केलेली समिती, छपाई केंद्राचे नाव आणि पत्त्याची मागणी केली.

मात्र, ही सर्व गोपनीय माहिती देण्यास परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नकार दिला. तातडीने माहिती देता येणार नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, अशी माहिती अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली. तपासासाठी आवश्यक माहिती परिषदेकडून वेळेत मिळत नसल्याने तपास अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांच्याशी 'लोकमत' ने संपर्क साधला. ते म्हणाले, 'बुधवारी सायंकाळी कोल्हापूर पोलिस आमच्याकडे पोहोचले. त्यांनी तातडीने माहितीची मागणी केली. मात्र, गोपनीय माहिती देण्यासाठी काही प्रक्रिया असते. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय सांगतो, असे त्यांना कळवले आहे. पेपर फुटीच्या गुन्ह्याचा उलगडा होऊन दोषींना शिक्षा व्हावी, अशी आमचीही भूमिका आहे. तपासासाठी आवश्यक असलेली माहिती देण्याचा प्रयत्न सुरू आहे.'परीक्षा परिषदेकडून सहकार्याची अपेक्षाटीईटी परीक्षेचे नियोजन कोणत्या कंपनीला दिले होते? प्रश्नपत्रिका कोणी तयार केल्या? त्यांची छपाई कुठे झाली? प्रश्नपत्रिका सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी कोणाची होती? याची माहिती मिळाल्याशिवाय तपास पुढे जाणार नाही. पुन्हा असे प्रकार घडू नयेत, यासाठी परीक्षा परिषदेने स्वत:च पुढाकार घेऊन पोलिसांना तपासात सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक सुजीत क्षीरसागर यांनी सांगितले.रितेशकुमार अन् गायकवाड बंधूंची भेटटीईटीची प्रश्नपत्रिका पुरवणारा रितेशकुमार आणि कराड तालुक्यातील गायकवाड बंधू यांची २० नोव्हेंबरला पुण्यातील एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. रितेशकुमारसोबत आणखी पाच जण होते. त्या सर्वांची माहिती पोलिसांना मिळाली आहे. लवकरच त्यांच्यावर अटकेची कारवाई होईल, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur TET Paper Leak: Exam Council Uncooperative, Police Investigation Hampered

Web Summary : Kolhapur police investigating the TET paper leak allege the exam council is withholding crucial information. This lack of cooperation is raising suspicions. Investigation focuses on identifying those involved in leaking the paper.