शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्याच्या संध्याकाळची सोबत...

By admin | Updated: August 19, 2015 00:12 IST

डे केअर सेंटरचे उद्घाटन : वृद्धांच्या एकाकीपणावर मात करण्यासाठी उपक्रम

कोल्हापूर : कुटुंबातील कर्ती माणसं, वाढते धकाधकीचे जीवन, ताणतणावाखाली लहान मुलांचे आणि महाविद्यालयीन तरुणाईचे स्वत:चे विश्व अशा परिस्थितीत कुटुंबातील वृद्धांना मात्र दिवसभर एकटेपणाला सामोरे जावे लागते. वृद्धांना आयुष्याची ही संध्याकाळ समवयस्क व्यक्तींसोबत आनंदात घालवता यावी, यासाठी मनीष देसाई यांच्यावतीने ‘सोबत डे केअर सेंटर’ची सुरुवात केली आहे. देवकर पाणंद येथील तेंडुलकर सदनमध्ये जाणीव चॅरिटेबल फौंडेशनच्यावतीने सुरू केलेल्या या सेंटरचे उद्घाटन मंगळवारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर व सावली केअर सेंटरचे संस्थापक किशोर देशपांडे यांच्या हस्ते झाले. मनीष देसाई यांचे वडील शैलेंद्र देसाई यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त हा उपक्रम सुरू केला आहे. यावेळी शिपूरकर म्हणाले, आपल्या वडिलांच्या स्मृती एका सामाजिक कार्याने करणाऱ्या देसाई कुटुंबाचे विशेष अभिनंदन. अनेक लोक प्रसिद्धीच्या हव्यासाने उपक्रम घेत असतात; पण त्यापासून दूर राहत देसाई यांनी सुरू केलेल्या या उपक्रमामुळे वृद्धांच्या आयुष्याची संध्याकाळ आनंददायी होणार आहे. किशोर देशपांडे म्हणाले, तारुण्यात आपल्याला छंद असलेल्या अनेक गोष्टी करायच्या राहून गेलेल्या असतात. वृद्धत्व हा काळ म्हणजे माणसाचा जणू पुनर्जन्म असतो. या कालावधीत मिळणारा वेळ आपले सर्व छंद जोपासण्यासाठी, हौस, मौज आणि इच्छा पूर्ण करण्यासाठीच असतो. त्यामुळे हा काळ मनसोक्त जगा, काही मदत लागली तर ऋणानुबंध ट्रस्ट सहकार्य देईल. देसाई यांनी वडिलांच्या आठवणी जागविल्या. स्मिता नाईक यांनी प्रास्ताविकात मनोबल ट्रस्टची माहिती दिली. अश्विनी नाईक यांनी इशस्तवन केले. रविदर्शन कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)