सुखी संसाराचे सारं म्हणजे आधार देणारी माणसं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:06 IST2021-02-05T07:06:57+5:302021-02-05T07:06:57+5:30

‘जोडी तुझी माझी’ उपक्रमातून नवदाम्पत्याना ऊर्जा लोकमत न्यूज नेटवर्क उचगाव : संसाराच्या वेलीवर फुलणाऱ्या नव दाम्पत्यांनी एकत्र कुटुंब पद्धतीतून ...

The essence of a happy world is a supportive person | सुखी संसाराचे सारं म्हणजे आधार देणारी माणसं

सुखी संसाराचे सारं म्हणजे आधार देणारी माणसं

‘जोडी तुझी माझी’ उपक्रमातून नवदाम्पत्याना ऊर्जा

लोकमत न्यूज नेटवर्क

उचगाव : संसाराच्या वेलीवर फुलणाऱ्या नव दाम्पत्यांनी एकत्र कुटुंब पद्धतीतून पन्नाशीचा उंबरठा पार केलेल्याची काळजी घेणे आवश्यक आहे. बांधलेल्या इमल्याना आधार देणारी माणसंच सुखी संसाराचे सारं आहे, असे प्रतिपादन करवीर पंचायत समितीच्या माजी सदस्या अरुणीमा माने यांनी केले.

उजळाईवाडी (ता. करवीर) येथील एस.फोर.ए ग्रुपच्या वतीने नव दाम्पत्यासाठी आयोजित ‘जोडी तुझी माझी’ या कौटुंबिक कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी एस. राजू माने म्हणाले की, कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत लग्नाचे बेत निवडक पै-पाहुण्याच्या उपस्थितीत पार पडले. त्यामुळे ‘जोडी तुझी माझी’ या उपक्रमातून नव दाम्पत्यांना थोडा विरंगुळा निर्माण व्हावा यासाठी दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते. अवनिज केकसच्या कु. अवनी राजू माने व श्रीनिवास राजू माने यांनी या उपक्रमाद्वारे २० नवे वधू-वर याचा शोध घेऊन त्यांना एकत्र आणत त्यांना व्यासपीठ मिळवून दिले.

या कार्यक्रमात २० नववधू-वर यांनी आपले अनुभव व्यक्त केले. जोडी तुझी माझी या कार्यक्रमामुळे अनेकांना स्वप्न सुखी संसाराची, पूर्ण झाली सर्व माझी, सुख दुःखाचे दिवस झेलायला साथ तुझी...माझी अशा भावना व्यक्त झाल्या.

३१ उजळाईवाडी

फोटो ओळ : उजळाईवाडी (ता. करवीर) येथील एस.फोर.ए ग्रुपच्या वतीने नवदाम्पत्यांसाठी आयोजित ‘जोडी तुझी माझी’ या कार्यक्रमात बोलताना एस राजू माने, अरुणीमा माने, आदी उपस्थित होते.

Web Title: The essence of a happy world is a supportive person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.