उद्योजक संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण: ‘त्या’ माजी नगरसेविकेसह राऊतच्या पोलिस कोठडीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 19:26 IST2023-06-30T19:26:33+5:302023-06-30T19:26:58+5:30
न्यायालयाच्या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी

उद्योजक संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण: ‘त्या’ माजी नगरसेविकेसह राऊतच्या पोलिस कोठडीत वाढ
राम मगदूम
गडहिंग्लज : येथील अर्जून उद्योग समूहाचे प्रमुख संतोष शिंदे तिहेरी आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या ‘त्या’ नगरसेविकेसह अमरावतीचे निलंबित सपोनि राहूलकुमार राऊत या दोघांची पोलिस कोठडी एक दिवसाने वाढली. आज (शनिवारी) पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
आठवड्यापूर्वी येथील उद्योजक शिंदे, त्यांची पत्नी तेजस्विनी व मुलगा अर्जून यांनी राहत्या घरातील बेडरूममध्ये विष प्राशन करून व गळे चिरून घेवून आत्महत्या केली. ‘ती’ माजी नगरसेविका आणि राऊत यांनी संगनमताने बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून १ कोटीची खंडणी मागून त्रास दिल्याने आत्महत्या करीत असल्याचे सुसाईड नोट मृत्यूपूर्वी लिहून ठेवले आहे. त्यावरून त्यांच्यासह चौघांविरूद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पाच दिवसांची पोलिस कोठडी संपल्यामुळे त्या दोघांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुजित राठोड यांच्यासमोर उभे करण्यात आले होते. न्यायालयाच्या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी केली होती.