शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजक संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण: आत्महत्या की घातपात?, फाॅरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची दुसऱ्यांदा तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 12:50 IST

तब्बल दोन तासांच्या चौकशीनंतर पथक माघारी परतले

गडहिंग्लज : येथील अर्जुन उद्योग समूहाचे प्रमुख संतोष शिंदे तिहेरी आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने बुधवारी घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, पोलिस कोठडीतील ‘त्या’ माजी नगरसेविकेसह सपोनि राहुलकुमार राऊत यांच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.शुक्रवारी रात्री उद्योजक शिंदे, त्यांची पत्नी तेजस्विनी व मुलगा अर्जुन यांनी राहत्या घरातील बेडरूममध्ये विष प्राशन करून व गळे चिरून घेऊन आत्महत्या केली. ‘ती’ माजी नगरसेविका आणि राऊत यांनी संगनमताने बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून १ कोटीची खंडणी मागून त्रास दिल्याने आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद असल्यामुळे त्या नगरसेविकेसह राऊतविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान, बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कोल्हापूर येथील फॉरेन्सिक लॅबचे डॉ. सनी खंदारे यांच्या नेतृत्वाखालील चौघांच्या पथकाने येथील गांधीनगरातील शिंदे यांच्या निवासस्थानी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक गजानन सरगर, शीतल शिसाळ आदी उपस्थित होते.

तब्बल दोन तास चौकशीशिंदे यांच्या त्या बेडरूमला दोन दरवाजे व एक खिडकी आहे. खिडकीला जाळी मारण्यात आली असून बेडरूममध्ये जाण्यासाठी हॉलमध्ये जिन्याची सोय आहे. त्यामुळे त्यांनी स्वत:हून आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला आहे ? यासंदर्भात माहिती घेण्यासाठी फॉरेन्सिकचे पथक आले होते. घटनास्थळाच्या तपासणीनंतर तपासी अधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली. तब्बल दोन तासांच्या चौकशीनंतर पथक माघारी परतले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस