शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

इचलकरंजी पालिकेत अभियंता व पंटर लाचलुचपतच्या जाळ्यात, सामाजिक कार्यकर्त्यांनी उडविले फटाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 3:16 PM

नगरपालिकेच्या नगररचना विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्याचे समजताच नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी फटाके उडवले.

इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या नगररचना विभागातील अभियंता व त्याच्या पंटरला वीस हजारांची लाच स्विकारताना कोल्हापूरच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले. अभियंता बबन खोत व त्याचा पंटर किरण कोकाटे अशी या दोघांची नावे आहेत. कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू असताना ही कारवाई झाल्याने पालिका वतुर्ळात खळबळ उडाली.याबाबत माहिती अशी, शहरातील एका नागरिकाने नगररचना विभागाकडे गुंठेवारीचे प्रकरण मार्गी लावण्यासाठी फाईल दिली होती. यासाठी संबंधित व्यक्तीकडून २५ हजारांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती २० हजार रुपये देण्याचे ठरले. मंगळवारी कोकाटेच्या माध्यमातून ही रक्कम अभियंता खोत घेणार होता. याची तक्रार संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे केली होती.

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पालिकेतील नगररचना विभागाच्या आवारातच ही लाच स्विकारताना लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी दोघांना पकडले. चार दिवसांपासून या प्रकरणाची पडताळणी कारवाईपूर्वी पथकातील कर्मचाऱ्याकडून सुरू होती. गेल्या अनेक दिवसांपासून पालिका कर्मचाऱ्याच्या कामकाजाबाबत तक्रारी सुरू होत्या. पालिकेत लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली.

कोल्हापूर लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, शरद पुरे, विकास माने, सुनील घोसाळकर, मयूर देसाई, रुपेश माने यांनी ही कारवाई केली.सामाजिक कार्यकर्त्यांनी उडविले फटाकेनगरपालिकेच्या नगररचना विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्याचे समजताच नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी फटाके उडवले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीichalkaranji-acइचलकरंजी