कडक बंदोबस्तात विशाळगडावर अतिक्रमण हटाव मोहिम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 12:43 IST2025-05-31T12:42:51+5:302025-05-31T12:43:04+5:30
पुरातत्व, वनविभाग व महसूल विभागाच्या वतीने बारा ते पंधरा अतिक्रमणे काढण्याची सज्जता केली आहे.गोपणिय रित्या आजची मोहीम राबवली आहे.

कडक बंदोबस्तात विशाळगडावर अतिक्रमण हटाव मोहिम
आंबा: प्रशासकीय यंत्रणेच्या मोठ्या ब़ंदोबस्तात आज सकाळपासून विशाळगडावरअतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली आहे.गोपणीय पध्दतीने आज सकाळपासून कारवाईस प्रारंभ केला.पावसाळा तोंडावर आल्याने व काही ग्रामस्थ न्यायालयात गेल्याने अतिक्रमण पावसाळ्यानंतर होईल म्हणून व्यावसायिक उन्हाळी सुट्टीतील पर्यटकांच्या प्रतिक्षेत होते.मध्यंतरी सहा दिवस अवकाळी पावसामुळे येथील पर्यटनात खंड पडला होता.आजच्या आकस्मिक मोहीमेमुळे व्यावसाईकांच्या तोंडचे पाणी पळाले.
पुरातत्व, वनविभाग व महसूल विभागाच्या वतीने बारा ते पंधरा अतिक्रमणे काढण्याची सज्जता केली आहे.गोपणिय रित्या आजची मोहीम राबवली आहे. यासाठी शाहुवाडी व कोल्हापूरहून मोठा पोलीस बंदोबस्त सज्ज आहे.मध्यंतरी नूतन जिल्हा पोलिस प्रमुखांनी विशाळगडास भेट देऊन अतिक्रमणाची पाहणी केली होती.
शुक्रवार ते रविवार गडावर पर्यटक व भाविकांची गर्दी असते पण आज कारवाई चालू असल्याने केंबुर्णेवाडी येथेच सर्व वाहणे रोखण्यात आली आहेत.त्यामुळे गड व गजापूर परीसरात शुकशुकाट पसरला होता.