रिकामटेकड्या मुलाचा पैशासाठी पित्यावर सशस्त्र हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 17:25 IST2019-10-10T17:24:37+5:302019-10-10T17:25:49+5:30
कोल्हापूर : काम न करणाऱ्या मुलाने घरखर्चासाठी पैसे दिले नाही म्हणून ८१ वर्षे वय असणाऱ्या पित्याच्या डोक्यात धारदार शस्त्राचा वार ...

रिकामटेकड्या मुलाचा पैशासाठी पित्यावर सशस्त्र हल्ला
कोल्हापूर : काम न करणाऱ्या मुलाने घरखर्चासाठी पैसे दिले नाही म्हणून ८१ वर्षे वय असणाऱ्या पित्याच्या डोक्यात धारदार शस्त्राचा वार करून गंभीर जखमी करण्याचा प्रकार पाचगाव येथील द्वारकानाथ आर. के. नगरात घडला. अमरसिंह मारुती माने (रा. प्लॉट नं. १८, पाचगाव रोड, कोल्हापूर) असे जखमी पित्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पृथ्वीराज अमरसिंह माने (वय ४९, रा. प्लॉट नं. १८, द्वारकानाथ आर. के. नगर, पाचगाव रोड) हा विवाहित असून, तो काहीही कामधंदा न करता वडिलांच्या घरातच विभक्तपणे दुसऱ्यां खोलीत राहत होता. त्याचा घरखर्चही वडील अमरसिंह माने हेच पाहतात.
बुधवारी (दि. ९) या पिता-पुत्रांमध्ये वाद झाला. त्यावेळी त्याने वडिलांकडे घरखर्चासाठी पैसे मागितले. वडिलांनी देण्यास नकार दिल्याच्या रागातून पृथ्वीराज याने धारदार लोखंडी पात्याच्या हत्याराने वडील अमरसिंह माने यांच्या डोक्यात प्रहार केला. या हल्ल्यात अमरसिंह माने हे गंभीर जखमी झाले. त्यांना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात पथ्वीराज माने याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.