कौलगेतील पतसंस्थेत ४८ लाखांचा अपहार, शाखाधिकाऱ्याविरूध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 15:29 IST2020-10-30T15:28:25+5:302020-10-30T15:29:50+5:30
Fraud, Crimenews, kolhapurnews, police कौलगे (ता.गडहिंग्लज) येथील कल्लेश्वर सहकारी पतसंस्थेत ४८ लाख ११ हजार १६७ रुपयांचाअपहार केल्याप्रकरणी शाखाधिकारी सुनील धोंडीबा पोवार (रा.कौलगे ता. गडहिंग्लज )याच्याविरुद्ध गडहिंग्लज पोलीसात गुन्हा दाखल झाला.

कौलगेतील पतसंस्थेत ४८ लाखांचा अपहार, शाखाधिकाऱ्याविरूध्द गुन्हा
गडहिंग्लज : कौलगे (ता.गडहिंग्लज) येथील कल्लेश्वर सहकारी पतसंस्थेत ४८ लाख ११ हजार १६७ रुपयांचाअपहार केल्याप्रकरणी शाखाधिकारी सुनील धोंडीबा पोवार (रा.कौलगे ता. गडहिंग्लज )याच्याविरुद्ध गडहिंग्लज पोलीसात गुन्हा दाखल झाला.
पोलीसातून मिळालेली माहिती अशी, सुनिल हा गावातील कल्लेश्वर पतसंस्थेत शाखाधिकारी म्हणून काम पाहतो. एप्रिल २०१४ ते मार्च २०१९ या कालावधीत त्याने सभासद, ठेवतारण, सोनेतारण, स्थावरतारण आदी कर्ज आणि मुदतबंद ठेव, ठेवीच्या फरकापोटी जमा रकमा खात्यावर नोंदविल्या. परंतु,किर्दीस जमा न घेता आपल्यासाठी वापरल्या.
ठेवीदारांची पुर्नगुंतवणुक रक्कम खात्यावर नोंदवली. परंतु, पावतीची नोंद किर्दीस जमा न करता ते पैसेदेखील स्वत:च्या फायद्यासाठी र वापरले. त्यासंदर्भात विचारणा झाल्यानंतर त्या रकमेचा भरणा केला. लेखापरीक्षक दयानंद पोवार यांच्या फिर्यादीवरून पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे.