शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

तांत्रिक अडचणी दूर करा, अन्यथा आंदोलन, पवित्र पोर्टलबाबत ‘नौजवान सभे’चा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 11:01 AM

पवित्र पोर्टलबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर करा. या पोर्टलवर माहिती भरण्यासाठी मुदतवाढ द्या, अन्यथा बुधवार (दि. २९) पासून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय नौजवान सभा या संघटनेच्या वतीने  देण्यात आला. त्याबाबतचे निवेदन संघटनेने साहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांना दिले.

ठळक मुद्दे तांत्रिक अडचणी दूर करा, अन्यथा आंदोलन, पवित्र पोर्टलबाबत ‘नौजवान सभे’चा इशारासाहाय्यक शिक्षक उपसंचालकांना निवेदन

कोल्हापूर : पवित्र पोर्टलबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर करा. या पोर्टलवर माहिती भरण्यासाठी मुदतवाढ द्या, अन्यथा बुधवार (दि. २९) पासून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय नौजवान सभा या संघटनेच्या वतीने  देण्यात आला. त्याबाबतचे निवेदन संघटनेने साहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांना दिले.शिक्षक भरतीसाठी राज्य सरकारने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून कार्यवाही सुरू केली आहे. पोर्टलवर उमेदवारांकडून प्राधान्यक्रम भरून घेण्याची प्रक्रिया दि. २२ मेपासून सुरू झाली. या पोर्टलबाबत उमेदवारांमध्ये राज्यभर संभ्रमावस्था आहे. त्या दूर करण्याऐवजी त्यामध्ये भर घालण्याचे काम करीत आहे. त्याबाबत काही मागण्या संघटना करत आहेत. त्यात डी. एड., बी. एड., पदवीधारकांची एकूण संख्या १0 लाखांहून अधिक आहे; मात्र, पवित्र पोर्टलद्वारे केवळ १२ हजार जागांच्या शिक्षकांची भरती शासन करत आहे.

उर्वरित सर्व जागांची भरती शासनाने दुसऱ्या फेरीतून जून, जुलैमध्ये त्वरित करावी. भरती होत असलेल्या एकूण जागांपैकी काही जागा खाजगी अनुदानित संस्थांमध्ये भरल्या जाणार आहेत. या जागांकरिता १ : १० मुलाखतीसाठी पात्र करून मुलाखत संस्थाचालक घेण्याची तरतूद केली आहे; त्यामुळे संस्था चालकांकडून उमेदवारांत नोकरीसाठी पैसे घेण्याची दाट शक्यता आहे. शासनाने मुलाखतीची तरतूद रद्द करावी.

पोर्टलमध्ये उमेदवारांची माहिती भरण्यामध्ये, वयाच्या अटीमध्ये, दिव्यांगांच्या आरक्षणासाठी व इतर अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत; त्यामुळे दि. ३१ मे रोजीपर्यंत माहिती भरायची मुदत आहे. या मुदतीमध्ये वाढ करावी. तांत्रिक मुद्यांचे निराकारण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मदत कक्ष सुरू करावा. वयोमर्यादा शिथिल करावी. शासनाकडून शिक्षक, विद्यार्थी प्रमाण हे शिक्षण हक्क कायद्यानुसार लागू करावे, आदी मागण्या या निवेदनाद्वारे केल्या आहेत.

या शिष्टमंडळात गिरीश फोंडे, प्रशांत आंबी, आरती रेडेकर, राम करे, संतोष आयरे, जावेद तांबोळी, सयाजी गुरव, संतोष पोवार, बाळाताई ठाणेकर, स्वाती तावडे, प्रतापराव यादव, कौसर शिकलगार, महेंद्र ठाणेकर, आदींचा समावेश होता. दरम्यान, निवेदन देण्यापूर्वी बिंदू चौकातील रेडफ्लॅग बिल्ंिडगमध्ये संघटनेची बैठक झाली. त्यामध्ये आंदोलन करण्याबाबत चर्चा झाली.पाठपुरावा केला जाईलदरम्यान, निवेदन दिल्यानंतर साहाय्यक शिक्षण संचालक चौगुले म्हणाले, या उमेदवारांनी निवेदनाद्वारे केलेल्या तक्रारी, मागण्या गंभीर आहेत. हे निवेदन शिक्षण आयुक्तांकडे पाठवून त्याबाबत पाठपुरावा केला जाईल. 

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षकkolhapurकोल्हापूर