Eleven year old boy abducted from Gandhi Nagar | गांधीनगरातून अकरा वर्षीय मुलाचे अपहरण

गांधीनगरातून अकरा वर्षीय मुलाचे अपहरण

ठळक मुद्देगांधीनगरातून अकरा वर्षीय मुलाचे अपहरण गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

गांधीनगर -मनीषकुमार घराच्या मागील बाजूस असणाऱ्या मैदानावर खेळावयास गेला होता. नातेवाईक व परिसरात त्याचा शोध घेतला; पण तो मिळून आला नाही. त्याचे अज्ञाताने फूस लावून अपहरण केले असल्याची फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

दरम्यान, अतिरिक्त पोलीसप्रमुख तिरुपती काकडे यांनी गांधी नगर पोलीस ठाण्यास भेट देत तपासाच्या सूचना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चार शोध पथके नेमली आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, पोलीस उप-निरीक्षक अतुल कदम व पोलिसांची पथके विविध ठिकाणी शोध घेत आहेत.

गांधी नगर येथील पंचगंगा नदी घाट परिसरात मंगळवारी अपहृत मुलाची कपडे व चप्पल शोध पथकातील पोलिसांना मिळाली आहेत. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले असून, अपहरण की घातपात, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.

Web Title: Eleven year old boy abducted from Gandhi Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.