अकरा महिन्यांनंतर धावली कोल्हापूर-धनबाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 19:19 IST2021-02-19T19:17:52+5:302021-02-19T19:19:09+5:30
Railway Kolhapur- उत्तर भारतामध्ये जाण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या कोल्हापूर-धनबाद-कोल्हापूर या विशेष रेल्वेचा प्रारंभ शुक्रवारी झाला. कोरोनामुळे थांबलेली ही दीक्षाभूमी एक्स्प्रेस अकरा महिन्यांनंतर पुन्हा धावली. त्यातून पहिल्यादिवशी १९३ जणांनी प्रवास केला. त्यात कोल्हापूर, सांगली, मिरज, पंढरपूर येथील प्रवाशांचा समावेश होता.

अकरा महिन्यांनंतर धावली कोल्हापूर-धनबाद
कोल्हापूर : उत्तर भारतामध्ये जाण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या कोल्हापूर-धनबाद-कोल्हापूर या विशेष रेल्वेचा प्रारंभ शुक्रवारी झाला. कोरोनामुळे थांबलेली ही दीक्षाभूमी एक्स्प्रेस अकरा महिन्यांनंतर पुन्हा धावली. त्यातून पहिल्यादिवशी १९३ जणांनी प्रवास केला. त्यात कोल्हापूर, सांगली, मिरज, पंढरपूर येथील प्रवाशांचा समावेश होता.
कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसमधून शुक्रवारी पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी ही रेल्वे सुटली. मिरज, कुर्डुवाडी, पंढरपूरमार्गे दुपारी तीनच्यासुमारास रेल्वे लातूरमध्ये पोहोचली. ठिकठिकाणी प्रवासी समिती सदस्यांनी तिचे स्वागत केले. परळी-वैजनाथ, परभणी, पूर्णा, नांदेड, अकोला, नागपूर, इटारसी, गया, जबलपूर, पारसनाथमार्गे ही रेल्वे रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास धनबादला पोहोचणार आहे.
धनबाद येथून दर सोमवारी सकाळी सव्वादहा वाजता ही रेल्वे निघणार असून, आलेल्या मार्गाने परतीचा प्रवास करत बुधवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास कोल्हापूरला पोहोचणार आहे. या रेल्वेला १९ डबे आहेत. त्यातून प्रवास करण्यासाठी तिकीट आरक्षित करणे आवश्यक आहे.