शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील अकरा कारखान्यांनी ३३२३ रुपये दराने केली साखरेची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 11:53 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने माजी खासदार राजू शेट्टी यांना दिलेल्या लेखी माहितीतून उघड झाले

बांबवडे : कोल्हापूर जिल्ह्यातील अकरा साखर कारखान्यांनी नोव्हेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या बारा महिन्यांत सरासरी ३३२३ रुपये प्रतिक्विंटल दराने साखरेची विक्री केल्याचे गुरुवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना दिलेल्या लेखी माहितीतून उघड झाले. ही माहिती रात्री उशिरा मिळाल्याने त्याचा अभ्यास केलेला नाही. आज, शुक्रवारी बँकेने कारखानानिहाय दिलेली आणि वार्षिक अहवालात दिलेल्या साखर विक्रीचा आणि शिल्लक साखरेचा तुलनात्मक अभ्यास करून आम्ही त्याचे उत्तर देऊ असे संघटनेने स्पष्ट केले आहे.गेल्या गळीत हंगामातील उसाला ४०० रुपयांचा दुसरा हप्ता मिळण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा सुरू आहे. कारखानदार खुल्या बाजारात चढ्या दराने साखरेची विक्री करीत आहेत. मात्र आरएसएफच्या सूत्रानुसार ऊस उत्पादकांना ४०० रुपये द्यावे लागतात, म्हणून कमी दराने साखरेची विक्री केल्याचे दाखवत आहेत, असा त्यांचा आरोप आहे. म्हणून त्यांनी जिल्हा बँकेला पत्र देऊन प्रत्येक महिन्याला केलेल्या साखर विक्रीची आणि दराची माहिती द्यावी, अशी मागणी बुधवारी केली होती. यानुसार बँकेच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी आक्रोश पदयात्रा बांबवडे येथे असताना शेट्टी यांना ११ कारखान्यांची माहिती दिली. सांगली जिल्ह्यातील वाळव्याचा हुतात्मा वगळता इतर १० कारखाने कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. बँकेने दिलेल्या माहितीनुसार सरासरी ३३२३ रूपये प्रतिक्विंटल दराने साखरेची विक्री केल्याचे स्पष्ट झाले आहे. ही माहिती देऊन संघटना खुल्या बाजारात ३७०० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटल असा साखरेचा भाव आहे, असा संघटनेचा दावा बँकेने खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे यावर संघटना पुढील भूमिका काय स्पष्ट करणार यासंबंधी उत्सुकता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेbankबँकSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना