शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

जिल्ह्यात अकरा बंधारे पाण्याखाली, गगनबावड्यासह आजरा, शाहूवाडीत पावसाचा जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 5:40 PM

कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी पावसाची संततधार सुरूच राहिली. गगनबावडा, आजरा , शाहूवाडीत पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यातील अकरा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धरण क्षेत्रात चांगला पाऊस असून वीजनिर्मितीसाठी धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात अकरा बंधारे पाण्याखालीगगनबावड्यासह आजरा, शाहूवाडीत पावसाचा जोर

कोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी पावसाची संततधार सुरूच राहिली. गगनबावडा, आजरा , शाहूवाडीत पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यातील अकरा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धरण क्षेत्रात चांगला पाऊस असून वीजनिर्मितीसाठी धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे.जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर आहे. गुरुवारी दुपारनंतर पावसाने काहीसी विश्रांती घेतली असली तरी शुक्रवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच राहिली. दिवसभर एकसारखा पाऊस सुरू आहे. विशेष म्हणजे हातकणंगले, शिरोळ तालुक्‍यातील पाऊस समाधानकारक आहे. गगनबावडा तालुक्‍यात अतिवृष्टी तर राधानगरी शाहूवाडी, आजरा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे.

धरण क्षेत्रात ही चांगला पाऊस सुरू असून राधानगरी धरणातून वीज निर्मितीसाठी प्रतिसेकंद १४५०, दूधगंगेतून ११००, कासारीतून २५०, कडवीतून १५० तर पाटगाव मधून ३५० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांची पातळी वाढत असून अकरा बंधारे पाण्याखाली गेले आहेत.शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी २६.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस ८४ मिलिमीटर इतका नोंद झाली.धरणातील पाणीसाठा घनफुट मध्ये असा, कंसात क्षमता -राधानगरी ः ५.११ (८.३६१), तुळशी ः १.८० (३.४७१), वारणा ः १९.५२ (३४.३९९), दूधगंगा ः १५.६७ (२५.३९३), कासारी ः १.५५ (२.७७४), कडवी ः १.३० (२.५१६), कुंभी ः १.६१ (२.७१५), पाटगाव ः २.४४ (३.७१६).

टॅग्स :Rainपाऊसradhanagari-acराधानगरीkolhapurकोल्हापूर