शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शेतीला दिवसा वीज, बिलाची माफी ५ वर्षे; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 13:40 IST

नेसरी येथे जनसन्मान यात्रेत घोषणा

गडहिंग्लज : राज्यातील ३ ते ७ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपाचे वीजबिल यापुढे शेतकऱ्यांनी भरायचे नाही, मागील बिलही द्यायचे नाही. ४४ हजार शेतकऱ्याच्या वीजबिल माफीचा निर्णय महायुती सरकारने घेतलेला हा निर्णय औटघटकेचा नाही. आता शेतीसाठी दिवसा वीज देणार असून वीजबिलाची माफी यापुढे ५ वर्षे कायम राहिल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.नेसरी येथे जनसन्मान यात्रेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, ‘गोकुळ’चे संचालक नवीद मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती.पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठीच कांदा व बासुमतीवरील निर्यातबंदी हटविण्याबरोबरच निर्यात मूल्यदेखील हटविले आहे. कापूस व सोयाबीनला अधिक भाव मिळण्यासाठी खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवले आहे. हत्ती, बिबटे, गवे, रानडुकरे आदींपासून होणारी नुकसान भरपाईदेखील वाढविणार आहोत.

आमदार राजेश पाटील म्हणाले, अजित पवार, मुश्रीफ यांच्यामुळेच ‘चंदगड’ला १६०० कोटीचा निधी मिळाला. बाबासाहेब कुपेकर, नरसिंगराव पाटील यांचे स्वप्न पूर्णत्वास नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. तरीदेखील काही लोकांना आगडोंब होत आहे, जनताच त्यांना उत्तर देईल.खासदार तटकरे, शीतल फराकटे यांचीही भाषणे झाली. जयसिंग चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. जानबा चौगुले यांनी स्वागत केले.

मुश्रीफांची अनुपस्थिती..अजितदादांचा खुलासा !पालकमंत्री मुश्रीफ या कार्यक्रमास उपस्थित नव्हते. त्याबाबत खुद्द अजित पवार यांनीच खुलासा केला. इचलकरंजी येथील पूर्वनियोजित कार्यक्रमामुळेच ते नेसरीला येऊ शकलेले नाहीत. माझ्या परवानगीनेच ते इचलकरंजीला गेले आहेत. त्याबाबत कोणताही गैरसमज नको, असेही त्यांनी स्पष्ट केले.मुश्रीफांविषयी त्यांना एवढा पोटशूळ का ?हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. जिल्ह्याचा विकास आणि बहुजनांच्या हितासाठीच त्यांनी अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, केवळ व्यक्तीद्वेषातूनच ‘संसदरत्न’ (सुप्रियाताई सुळे) त्यांच्यावर टीका करीत आहेत. मुश्रीफांविषयी त्यांना एवढा पोटशूळ का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवारFarmerशेतकरीelectricityवीज