शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रमाग व्यवसायाला जुन्याच दराने वीज बिलाची आकारणी

By admin | Updated: August 3, 2015 00:09 IST

अनिल बाबर : मुंबईतील बैठकीत ऊर्जामंत्र्यांचे आश्वासनच; यंत्रमागधारकांना दिलासा

विटा : यंत्रमाग लघुउद्योगातील २७ अश्वशक्तीच्या खाली आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या यंत्रमागाची वाढीव दराने आलेली वीजबिले जुन्या दरानेच भरून घेण्यात येतील, असे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले असून, यंत्रमागधारकांना जुन्या दरानेच वीजबिले भरण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती आ. अनिल बाबर यांनी दिली.यंत्रमागाच्या वीजदरात फरक होता. नव्या दराने वीजबिले आकारली गेल्याने वाढीव वीजबिलाचा फटका यंत्रमागधारकांना बसला होता. त्या पार्श्वभूमीवर यंत्रमागांना जुन्या दराने वीजबिल आकारणी करावी, अशी मागणी यंत्रमागधारकांतून होत होती. त्यामुळे मुंबईत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत आमदार अनिल बाबर, आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह महावितरणचे मुख्य अभियंता सतीश बापट, संचालक अभिजित देशपांडे यांची बैठक झाली. या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती आ. अनिल बाबर यांनी रविवारी विटा येथे पत्रकार परिषदेत दिली. आ. बाबर म्हणाले, वीज नियामक आयोगाने एक जूनपासून वीजदराची पुनर्रचना केली आहे. परंतु आयोगाने ठरवलेल्या तसेच राज्य शासनाच्या दरात वेगवेगळे दर आकारले जात आहेत. त्यामुळे वीजदर कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे यावेळी बैठकीत ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्याबाबतचा प्रश्नही विधानसभेच्या अधिवेशात उपस्थित केला होता. राज्य शासन यंत्रमाग दरात कोणत्याही परिस्थितीत वाढ होऊ देणार नाही. प्रसंगी परिपत्रक रद्द करण्याची किंवा अनुदान देण्याचे आश्वासन ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले होते. त्यानंतरही राज्यभरातील यंत्रमागधारकांना वाढीव वीजबिले देण्यात आल्याने ऊर्जामंत्र्यांच्या दालनात आ. हाळवणकर यांच्यासह महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी आ. हाळवणकर यांनी यंत्रमागधारकास वाढीव वीजबिल लागू केल्यास व्यावसायिकांसमोर येणाऱ्या अडचणींची बैठकीत माहिती दिली.महावितरणच्या अभियंत्यांनी यंत्रमागाला जुन्या दरानुसार वीजबिले आकारणी करण्यासाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करणे आवश्यक असल्याचे सांगितले. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी आवश्यक निधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर तातडीने देण्याचा आदेश दिला असल्याचे आ. बाबर यांनी सांगितले.यंत्रमागधारकांना जुन्या दरानेच वीजबिल आकारणी करावी, वाढीव वीज बिलाच्या कारणावरून कोणत्याही यंत्रमागधारकांचे वीज कनेक्शन तोडू नये, असे आदेश ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील यंत्रमागधारकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचेही आ. बाबर म्हणाले. (वार्ताहर)