कोल्हापुरात विवेकानंद कॉलेजजवळ इलेक्ट्रीकल दुचाकी जळून खाक

By भीमगोंड देसाई | Updated: July 21, 2023 12:08 IST2023-07-21T12:07:23+5:302023-07-21T12:08:10+5:30

कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेजजवळ आज, शुक्रवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास इलेक्ट्रीक दुचाकी पेटून खाक झाली. केवळ गाडीचा सांगाडा ...

Electric two wheeler burnt down near Vivekananda College in Kolhapur | कोल्हापुरात विवेकानंद कॉलेजजवळ इलेक्ट्रीकल दुचाकी जळून खाक

कोल्हापुरात विवेकानंद कॉलेजजवळ इलेक्ट्रीकल दुचाकी जळून खाक

कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेजजवळ आज, शुक्रवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास इलेक्ट्रीक दुचाकी पेटून खाक झाली. केवळ गाडीचा सांगाडा शिल्लक राहिला होता.

कसबा बावड्यातील शुगरमीलमधील हरीदास तुकाराम पवार हे दुचाकी घेवून मुलाला कॉलेजमध्ये सोडण्यासाठी येताना अचानक गाडीतून धूर निघाला. यामुळे ते दुचाकी सोडून काही अंतरावर थांबले. काही क्षणातच धूराचे आगीत रूपांतर झाले. दुचाकी पेटली. अग्निशमन पथकातील जवान तातडीने येवून आग विझवली. तत्पूर्वीच दुचाकी जळून खाक झाली होती. केवळ सांगाडा शिल्लक राहिला होता.

Web Title: Electric two wheeler burnt down near Vivekananda College in Kolhapur