शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांचा धडाका

By admin | Updated: February 23, 2015 00:16 IST

आजरा : सूतगिरणी, संघ, अर्बन बँक, जनता बँकेचा समावेश

ज्योतिप्रसाद सावंत - आजरा - तालुक्यात येत्या चार महिन्यांत २६ ग्रामपंचायतींसह अण्णा-भाऊ सहकारी सूतगिरणी, आजरा अर्बन बँक, आजरा तालुका खरेदी-विक्री संघ व जनता बँक या प्रमुख सहकारी संस्थांच्या निवडणुका होत असल्याने व सर्वच निवडणुका एकदमच आल्याने प्रमुख नेतेमंडळींची व्यूहरचना करताना दमछाक होणार आहे.तालुक्यातील हालेवाडी, बेलेवाडी हु।।, वाटंगी, सिरसंगी, महागोंड, मुमेवाडी, हत्तीवडे, सुळे, निंगुडगे, सरोळी, किणे, होनेवाडी, चव्हाणवाडी, खोराटवाडी, जाधेवाडी, गवसे, देवर्डे, एरंडोळ, कोवाडे, कासारकांडगाव, चिमणे, हाळोली, मलिग्रे, मुरुडे, पेद्रेवाडी, देवकांडगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम मे व जून महिन्यांत जाहीर झाला आहे. प्रभाग आरक्षणाचा कार्यक्रमही पार पडला आहे.आजरा सूतगिरणीचा निवडणूक कार्यक्रमही सुरू झाला आहे. एकीकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा धुमधडाका चालू असताना याच धामधुमीत सूतगिरणीचा कार्यक्रम आहे. सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न अण्णा-भाऊ संस्था प्रमुखांकडून सुरू आहे. आजरा तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. यावेळी तालुका संघाची निवडणूक जोरदार होणार हे स्पष्ट आहे. राष्ट्रवादींतर्गत अशोक चराटी व शिवसेना यांचा गट विरुद्ध जि. प. सदस्य मुकुंदराव देसाई, सुधीर देसाई, उदय पवार यांचा गट अशीच निवडणूक होण्याची चिन्हे आहेत.जनता सहकारी बँकेच्या निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत. जनता बँकेची निवडणूक नेहमीच चुरशीने झाली आहे. सद्य:स्थितीला राजकीय संदर्भ बदलत असल्याने जनता बँकेच्या निवडणुकीतही प्रचंड चुरस पाहावयास मिळणार आहे. एकंदर येत्या सहा महिन्यांत निवडणुकांचे तालुक्यात धूमशान उडणार, हे निश्चित.