शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

कोल्हापूर जिल्ह्यातील निवडणूक कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 3:30 PM

लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील ४००४ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. दोन्ही मतदारसंघांतील सुमारे २०,००० मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोमवारी अंतिम प्रशिक्षण देण्यात आले. यानंतर मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट व मतदान साहित्यासह केंद्रस्थळी रवाना झाले. मतदानाच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी पूर्ण झाली असून जिल्हा निवडणूक विभाग मतदानासाठी सज्ज आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यातील निवडणूक कर्मचारी मतदान केंद्रांवर रवानाअंतिम प्रशिक्षण पूर्ण : कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य वाटप

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील ४००४ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. दोन्ही मतदारसंघांतील सुमारे २०,००० मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोमवारी अंतिम प्रशिक्षण देण्यात आले. यानंतर मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट व मतदान साहित्यासह केंद्रस्थळी रवाना झाले. मतदानाच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी पूर्ण झाली असून जिल्हा निवडणूक विभाग मतदानासाठी सज्ज आहे.मतदानाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून दोन्ही मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रातील सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात झाली. यामध्ये कोल्हापूर दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांच्या उपस्थितीत पेटाळा येथील राम गणेश गडकरी हॉल, करवीरचे निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्या उपस्थितीत रमनमळा, बहुउद्देशीय हॉल येथे, कोल्हापूर उत्तरचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांच्या उपस्थितीत विवेकानंद महाविद्यालय येथे हे प्रशिक्षण झाले.

सुरुवातीला कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडे कोणती केंद्रे आहेत याची माहिती देण्यात आली. त्यानंतर क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून प्राथमिक प्रशिक्षण होऊन त्यानंतर सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांकडून महत्वपूर्ण माहिती देण्यात आली. मतदारांची ओळख पटवून घेऊनच त्यांना मतदानाचा हक्क बजावायला द्या, मतदानासाठी मतदान चिठ्ठीही पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही त्यामुळे मतदारांकडून इतर पुराव्यांची खातरजमा करा अशा विविध सुचना त्यांनी केली.

दरम्यान कोल्हापूरच्या निवडणूक निरिक्षक अलका श्रीवास्तव व निवडणूक निर्णय अधिकारी दौलत देसाई यांनी कोल्हापूर दक्षिण, कागल या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली.

मतदारसंख्यालोकसभा मतदार संघ          पुरुष         महिला         इतर            एकूणकोल्हापूर                            ९५७१८३       ९१७१४३    १९          १८७४३४५हातकणंगले                         ९१४३५८      ८५८१३८    ६७            १७७२५६३मतदान केंद्रेलोकसभा मतदार संघ              ग्रामीण           शहरी           एकूणकोल्हापूर                                    १५८०              ५६८           २१४८हातकणंगले                                  ३९८               ४५८          १८५६

 

मतदान कर्मचारीलोकसभा मतदार संघ                नियुक्त कर्मचारी     राखीव कर्मचारीकोल्हापूर                                        १०,७४०                    १०७४हातकणंगले                                    १०,१४३                       ९२८

 

मतदारांनी उत्स्फूर्तपणे व भयमुक्त वातावरणात आपल्या पवित्र मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कार्य करावे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी कोल्हापूर मतदारसंघातील मतदान कर्मचाऱ्यांना अंतिम प्रशिक्षण देऊन त्यांना मतदान यंत्र व साहित्यासह केंद्रांवर रवाना करण्यात आले आहे.-दौलत देसाई, निवडणूक निर्णय अधिकारी,कोल्हापूर मतदारसंघ

 

 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी सहा विधानसभा मतदारसंघातील मतदान कर्मचाऱ्यांना अंतिम प्रशिक्षण देऊन त्यांना मतदान यंत्र व मतदान साहित्यासह केंद्रांकडे रवाना करण्यात आले. निवडणूक यंत्रणा सज्ज असून मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांनी निर्भयपणे आपला हक्क बजावावा.-नंदकुमार काटकर, निवडणूक निर्णय अधिकारी,हातकणंगले मतदारसंघ

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी