शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

हलगीच्या ठेक्यावर दंडवत घालत पठ्ठ्या अंबाबाई मंदिरात पोहोचला फक्त मुख्यमंत्र्यांसाठी..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 19:41 IST

दुर्वा दळवी  कोल्हापूर : एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी कोल्हापुरातील एका सरपंचाने करवीर निवासिनी अंबाबाईला साकडे ...

दुर्वा दळवी कोल्हापूर : एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी कोल्हापुरातील एका सरपंचाने करवीर निवासिनी अंबाबाईला साकडे घातले. येवती गावचे सरपंच सागर जाधव यांनी आज, मंगळवारी आपल्या काही कार्यकर्त्यांच्या सोबत हलगीच्या ठेक्यावर देवीला दंडवत घातला. राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. नवे विधानमंडळ स्थापन होण्यासाठी आजच मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यामुळे पुढील मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली आहे. महायुतीच्या कार्यकाळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तम कामगिरी करत जनमानसात छाप पाडली आहे. त्यामुळे राज्यात विविध ठिकाणी शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून देवा चरणी प्रार्थना केली जात आहे. करवीर तालुक्यातील येवती गावचे सरपंच सागर जाधव यांनी अंबाबाई देवीच्या चरणी दंडवत घालत पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी साकडे घातले आहे. हलगीच्या ठेक्यावर त्यांनी देवीला दंडवत घातला. त्यांच्या या साकड्याला यश मिळते का हे मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर झाल्यावरच कळेल. 

विधानसभा निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल ७२ सभा घेतल्या. या सभांमुळेच महायुतीला पुन्हा एकदा यश मिळाले असून शिंदे यांच्या कामगिरीवर राज्यातील जनता खुश आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनाच महायुतीने संधी द्यावी. - सागर जाधव, येवती, करवीर

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरEknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024