शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
3
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
4
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
5
धक्कादायक..! नात्यातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
6
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
7
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
8
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
9
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
10
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
11
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
12
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
13
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
14
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
15
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
16
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
17
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
18
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
19
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
20
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!

पासिंग बंदमुळे आर्थिक भुर्दंड

By admin | Updated: December 5, 2014 23:39 IST

सहा ठिकाणचे कॅम्प बंद : कोल्हापूरला फेऱ्या गैरसोयीच्या आणि खर्चीक

जयसिंगपूर : वाहनधारकांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जिल्ह्यात सहा ठिकाणी वाहन पासिंग कॅम्प होतात. शासनाच्या धोरणामुळे गेल्या दोन महिन्यांपासून या कॅम्पवर वाहनांचे पासिंग करणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना कोल्हापूरला जाऊन पासिंग करणे अत्यंत गैरसोयीचे आणि खर्र्चीक ठरत आहे. वाहनधारकांकडून पर्यावरण कर, व्यवसाय कर, रोड टॅक्स, टोल नाक्यावरील टोल, अवाजवी विमा, आदीं कर शासनाकडून वसूल केला जातो. अवजड वाहतूक व्यवसायातील वाहने मंदीत असून, वाहनमालक व्यवसाय नसल्याने अडचणीत आले आहेत, अशा स्थितीत जुन्या वाहनांना पासिंग करताना प्रादेशिक परिवहन अधिकारी हॅँड ब्रेकची सक्ती करीत आहेत. त्यामुळे ही सक्ती रद्द करण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.जयसिंगपूरसह जिल्ह्यात सहा ठिकाणी वाहनांचे पासिंग रद्द केल्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. कोल्हापूरला जाऊन पासिंग करणे, त्यासाठी लागणारा डिझेल खर्च आणि दिवसभराचा वेळ आणि पैसा यांचा अपव्यय होत आहे. ट्रक व्यवसायात ७० टक्के वाहने ही मार्केटमध्ये जुनी आहेत. त्यामुळे जुन्या गाड्यांचे पासिंग नव्या गाड्यांप्रमाणेच लवकरात लवकर करून मिळावे आणि वेळ आणि पैशांची बचत करण्यासाठी बंद करण्यात आलेले पासिंग कॅम्प पूर्ववत सुरू करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे. दरम्यान, जयसिंगपूर येथील वाहनांचे पासिंग पूर्ववत सुरू करण्यात यावे, अशी मागणी कुमार पाटील यांनी परिवहन मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)