शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

दिव्यांग, मतिमंद शाळेतील शिक्षकांकडून ईश्वर सेवा -प्रशांत सातपुते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 12:20 PM

IndianRedcrosSociety, Divyang , school, kolhapurnews, कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग, मतिमंद, गतिमंद, कर्णबधीर अशा शाळेतील शिक्षक-कर्मचाऱ्यांकडून खऱ्या अर्थाने ईश्वर सेवेचे काम केले जाते, असे गौरवोद्गार जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी काढले.

ठळक मुद्देस्वयम् मतिमंद मुलांच्या शाळेत शीघ्र निदान व उपचार केंद्रदिव्यांग, मतिमंद शाळेतील शिक्षकांकडून ईश्वर सेवा -प्रशांत सातपुते

कोल्हापूर : जिल्ह्यातील दिव्यांग, मतिमंद, गतिमंद, कर्णबधीर अशा शाळेतील शिक्षक-कर्मचाऱ्यांकडून खऱ्या अर्थाने ईश्वर सेवेचे काम केले जाते, असे गौरवोद्गार जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी काढले.इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलीत स्वयम् मतिमंद मुलांच्या शाळेत शीघ्र निदान व उपचार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सातपुते म्हणाले, विशेष मुलांना उत्तम प्रकारे प्रशिक्षण देण्याचे काम जिल्हा परिषदेच्या या शाळांमधून होत आहे. याच प्रशिक्षणाच्या जोरावर ही मुले काही ठिकाणी नोकऱ्याही करत आहेत. पंखाविना भरारी आणि जिद्द काय असते ते या मुलांनी दाखवून दिले आहे.जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे म्हणाले, विशेष मुलांना स्वयंपूर्ण बनविण्याच्या दृष्टिने शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून होणारे काम हे प्रेरणादायी आहे. या मुलांनी बनवलेल्या वस्तू निश्चितच गौरवास पात्र आहेत आणि अशा मुलांना प्रशिक्षण देणारे शिक्षक कर्मचारी हे देखील सन्माननीय ठरत आहेत.स्वयम् उद्योग केंद्राच्या अध्यक्ष शोभा तावडे यांनीही यावेळी मनोगतात या शाळेमध्ये देणारे प्रशिक्षण, होणारे उपक्रम याविषयी माहिती दिली. यावेळी स्वयम् मतिमंद मुलांच्या शाळेचे अध्यक्ष राजूभाई जोशी, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष अमरदिप पाटील, श्रीनिवास मालू, खजानिस महेंद्र परमाळ, सदस्य कुलदीप कामत, मनीष देशपांडे, वकील सुलक्ष्मी पाटील, मुख्याध्यापक प्रमोद भिसे आदींसह शिक्षक-कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Divyangदिव्यांगSchoolशाळाkolhapurकोल्हापूर