दिव्यांग, मतिमंद शाळेतील शिक्षकांकडून ईश्वर सेवा -प्रशांत सातपुते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 12:20 PM2020-10-29T12:20:06+5:302020-10-29T12:24:07+5:30

IndianRedcrosSociety, Divyang , school, kolhapurnews, कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग, मतिमंद, गतिमंद, कर्णबधीर अशा शाळेतील शिक्षक-कर्मचाऱ्यांकडून खऱ्या अर्थाने ईश्वर सेवेचे काम केले जाते, असे गौरवोद्गार जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी काढले.

Early Diagnosis and Treatment Center in School for Self-Retarded Children | दिव्यांग, मतिमंद शाळेतील शिक्षकांकडून ईश्वर सेवा -प्रशांत सातपुते

दिव्यांग, मतिमंद शाळेतील शिक्षकांकडून ईश्वर सेवा -प्रशांत सातपुते

Next
ठळक मुद्देस्वयम् मतिमंद मुलांच्या शाळेत शीघ्र निदान व उपचार केंद्रदिव्यांग, मतिमंद शाळेतील शिक्षकांकडून ईश्वर सेवा -प्रशांत सातपुते

कोल्हापूर : जिल्ह्यातील दिव्यांग, मतिमंद, गतिमंद, कर्णबधीर अशा शाळेतील शिक्षक-कर्मचाऱ्यांकडून खऱ्या अर्थाने ईश्वर सेवेचे काम केले जाते, असे गौरवोद्गार जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी काढले.

इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलीत स्वयम् मतिमंद मुलांच्या शाळेत शीघ्र निदान व उपचार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सातपुते म्हणाले, विशेष मुलांना उत्तम प्रकारे प्रशिक्षण देण्याचे काम जिल्हा परिषदेच्या या शाळांमधून होत आहे. याच प्रशिक्षणाच्या जोरावर ही मुले काही ठिकाणी नोकऱ्याही करत आहेत. पंखाविना भरारी आणि जिद्द काय असते ते या मुलांनी दाखवून दिले आहे.

जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे म्हणाले, विशेष मुलांना स्वयंपूर्ण बनविण्याच्या दृष्टिने शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून होणारे काम हे प्रेरणादायी आहे. या मुलांनी बनवलेल्या वस्तू निश्चितच गौरवास पात्र आहेत आणि अशा मुलांना प्रशिक्षण देणारे शिक्षक कर्मचारी हे देखील सन्माननीय ठरत आहेत.

स्वयम् उद्योग केंद्राच्या अध्यक्ष शोभा तावडे यांनीही यावेळी मनोगतात या शाळेमध्ये देणारे प्रशिक्षण, होणारे उपक्रम याविषयी माहिती दिली. यावेळी स्वयम् मतिमंद मुलांच्या शाळेचे अध्यक्ष राजूभाई जोशी, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष अमरदिप पाटील, श्रीनिवास मालू, खजानिस महेंद्र परमाळ, सदस्य कुलदीप कामत, मनीष देशपांडे, वकील सुलक्ष्मी पाटील, मुख्याध्यापक प्रमोद भिसे आदींसह शिक्षक-कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Early Diagnosis and Treatment Center in School for Self-Retarded Children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.