शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

‘टीपी’चा कारभार अधिकाऱ्यांच्या मर्जीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:51 IST

भारत चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचा ( टीपी) कारभार आधीच भ्रष्ट आणि लुळापांगळा, त्यातच अनेक अधिकाºयांची नकारात्मक मानसिकता, ७0 टक्क्यांहून अधिक अधिकाºयांना ‘डी क्लास’ नियमावलीबाबत असलेली अपूर्ण माहिती यामुळे या विभागाचे काम ठप्प झाले आहे. येथील दुसºया फळीतील अधिकारी त्यांच्या मर्जीप्रमाणे काम करीत आहेत. येथे येणारे सर्वसामान्य ...

भारत चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचा ( टीपी) कारभार आधीच भ्रष्ट आणि लुळापांगळा, त्यातच अनेक अधिकाºयांची नकारात्मक मानसिकता, ७0 टक्क्यांहून अधिक अधिकाºयांना ‘डी क्लास’ नियमावलीबाबत असलेली अपूर्ण माहिती यामुळे या विभागाचे काम ठप्प झाले आहे. येथील दुसºया फळीतील अधिकारी त्यांच्या मर्जीप्रमाणे काम करीत आहेत. येथे येणारे सर्वसामान्य नागरिक रोज अधिकाºयांच्या नावाने खडे फोडतात; पण त्याची कोणालाच दयामाया राहिलेली नाही. टाळे ठोकल्यावरच यांच्या हातून फाईल क्लिअर होतात असा चार महिन्यांतील अनुभव आहे.माजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांनी मंगळवारी अक्षरश: वैतागून नगररचना विभागाच्या कार्यालयास टाळे ठोकले आणि कार्यालयातील अधिकाºयांच्या कार्यशैलीचा निषेध केला; त्यामुळे येथील विचित्र कारभारावर पुन्हा एकदा प्रकाशझोत पडला. भ्रष्टाचाराचे प्रमुख कुरण अशी या विभागाची गेल्या अनेक वर्षांपासून ओळख आहे; मात्र हा भ्रष्टाचार रोखण्यास आयएएस दर्जाचे अधिकारीही असमर्थ ठरले आहेत. माजी आयुक्त पी. शिवशंकर यांनी पूर्वी चार विभागीय कार्यालयांना बांधकाम परवानगी देण्याचे असलेले अधिकार बंद करून ते नगररचना विभागाकडे सुपुर्द केले. वास्तविक, चांगल्या सुविधा देण्याच्या हेतूने सगळ्या सुविधांचे विकेंद्रीकरण होत असताना शिवशंकर यांनी मात्र त्याचे केंद्रीकरण केले. त्यातून नागरिकांची जास्तच गैरसोय आणि छळवणूक व्हायला लागलीय.मुळात या विभागाकडे कर्मचारी, अधिकाºयांची संख्या कमी आहे. त्यातच केंद्रीकरण केल्यामुळे कामाचा व्याप मात्र चौपटीने वाढला आहे. १० बाय १० ची खोली जरी बांधायची झाली आणि १0 हजार स्क्वेअर फुटांचे बांधकाम जरी करायचे झाले तरी दोघेजण याच कार्यालयात यायला लागले आहेत. दोन्ही कामांना साईट सुपरव्हिजन करणे आणि प्रस्ताव लिहिणे यात वेळ सारखाच लागत असल्याने १० बाय १० ची खोली बांधणारा पार वैतागून जातो. परवानगी मिळेपर्यंत पिंजून जातो.कार्यालयातील सहायक संचालक धनंजय खोत यांची तीन महिन्यांपूर्वी बदली झाली आहे; मात्र त्यांना आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी कार्यमुक्त केलेले नाही. बदली झाल्यापासून खोत यांचे कार्यालयातील येणे - जाणे एखाद्या ‘पाहुण्या’सारखे झाले आहे. त्यांच्याकडून कामाचाही उठाव होत नाही. दुसरे अधिकारी उपशहर रचनाकार नारायण भोसले यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज दिला आहे, त्यांनाही आयुक्तांनी सोडलेले नाही; त्यामुळे त्यांच्या कामातील उत्साह पूर्ण मावळलेला आहे. त्यांच्याकडूनही कामाचा उठाव होत नाही. त्यांचीही साईट व्हिजिटच्या नावाने फिरती सुरू असते. अन्य अधिकारी जबाबदारी घेऊन काम करीत नाहीत; त्यामुळे या विभागातील बहुतेक सर्वच अधिकाºयांची भूमिका नकारात्मक बनली आहे.कार्यशाळेचे आश्वासन हवेतचमहानगरपालिका हद्दीत बांधकामांना रेरा कायदा, डी क्लास नियमावली लागू झाली आहे. या नियमावलीबाबत ७० टक्के अधिकारी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे तरतुदींचा कीस पाडण्यात आणि युक्तिवाद करण्यातच त्यांचा सर्वाधिक वेळ जात आहे. डी क्लास नियमावलीबाबत अधिकारी, बिल्डर्स, अभियंता यांची एक संयुक्त कार्यशाळा घ्यावी, अशी मागणी यापूर्वी झाली होती. आयुक्त चौधरी यांनी कार्यशाळा घेण्याचे आश्वासनही दिले होते; मात्र त्यांनीच हे आश्वासन पाळलेले नाही; त्यामुळे बांधकामांच्या फाईल्स तुंबल्या आहेत.महापालिकेचे आर्थिक नुकसानपूर्वी महिन्याला शहरातील मोठ्या गृह प्रकल्पाच्या किमान १० ते १२ फाईल मंजूर केल्या जात होत्या; पण रेरा कायद्यांतर्गत नोंदणी, डी क्लास नियमावली जशी लागू झाली तसे एक-दोन फाईलसुद्धा मंजूर होत नाहीत. महानगरपालिकेचे आर्थिक उत्पन्न बुडायला लागले आहे. मागच्या वर्षी सुमारे ७५ कोटींचे उत्पन्न नगररचना विभागाने महापालिकेला मिळवून दिले होते. यावर्षी जेमतेम ३५ ते ३७ कोटींपर्यंत जाईल अशी भीती आहे. जर उत्पन्न वाढवायचे असेल, तर कार्यालयाकडे येणाºया फाईल्स तातडीने निर्गत होणे आवश्यक आहे.बांधकामे नियमित करणे प्रलंबितचशहरातील अनियमित बांधकामे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, तसा अध्यादेश महापालिकेस प्राप्त झाला आहे. ज्या ठिकाणी बांधकामे नियमित करणे शक्य आहे, अशा व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात आले. त्यासाठी एक वेळ मुदतवाढ देण्यात आली. सुमारे ३५० हून अधिक फाईल्स या विभागाकडे दाखल झाल्या आहेत; मात्र त्या उघडूनदेखील कोणी बघितलेल्या नाहीत. अनियमित बांधकामे नियमित करताना त्यांना दंड किती लावायचा याचा अधिकार आयुक्तांना आहे. तरीही आयुक्तांनी अद्याप त्याबाबतचे निश्चित धोरण ठरविलेले नाही; त्यामुळे अनियमित बांधकामांचे कामदेखील प्रलंबित आहेत.