शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

Lok sabha 2024: कोल्हापुरात राजकीय पक्षांच्या कार्यालयांत गजबज

By समीर देशपांडे | Updated: March 28, 2024 18:08 IST

भाजप, काँग्रेसच्या कार्यालयात लगबग : राष्ट्रवादीचे रंगकाम सुरू

समीर देशपांडेकोल्हापूर : लोकसभा निवडणूक लागल्यामुळे पक्ष कार्यालयातील गजबज वाढली आहे. पक्षापेक्षा नेत्यांची कार्यालये आणि निवासस्थानांना महत्त्व येत चालल्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढले आहेत. तरीही येथील प्रमुख पक्ष कार्यालयांचा आढावा घेतला असता भाजप आणि काँग्रेसच्या कार्यालयात कामकाज जोरकसपणे सुरू असल्याचे दिसून आले.

भाजपने नागाळा पार्कामध्ये सुसज्ज असे जिल्हा कार्यालय बांधले आहे. सर्व सोयींनीयुक्त असलेल्या या कार्यालयात ग्रामीण आणि शहर पदाधिकाऱ्यांची बैठक व्यवस्था असून, खाली ४०० कार्यकर्त्यांची बैठक होईल, अशी सोय करण्यात आली आहे. आता मुख्य इमारतीमागे आणखी मोठा कायमस्वरूपी मंडप उभारण्यात येत असून, हजारभर कार्यकर्त्यांची सभा घेण्याची सोय केली जात आहे. बुधवारी दुपारी साडेबारा वाजता भाजप कार्यालयाला भेट दिली तेव्हा कार्यालय प्रमुख शंतनू मोहिते, सहायक सिद्धार्थ तोरसकर हे पक्षाच्या बैठकांचे फोटो अपलोड करत होते. ग्रामीणचे विजय शिंदे हे शुक्रवारच्या बैठकीचे पदाधिकाऱ्यांना फोनवरून निरोप देत होते. प्रचाराचे साहित्याचे गठ्ठे एका बाजूला लावण्यात आले होते.बाजार समितीच्या आवारात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय आहे. कार्यालय तसे लहानच आहे. परंतु ते गोदामासारखे वाटत असल्याने आता रंगवण्यासाठी काढले आहे. त्यामुळे येथील सर्व साहित्य बाजूला काढून ठेवण्यात आले असून, रंगकाम वेगात सुरू आहे. येत्या आठवड्याभरात हे कार्यालय रंगवून सज्ज होणार आहे. स्टेशन रोडवरील काँग्रेसचे कार्यालय आता मोठे झाले असून, या ठिकाणीही लगबग सुरू होती. कार्यालय सचिव रवींद्र मोरे यांच्याभोवती कार्यकर्त्यांचा गराडा पडला होता. या ठिकाणी मतदार याद्या फोडण्याचे काम सुरू होते.

धनंजय महाडिक चर्चेतभाजप कार्यालयात खासदार धनंजय महाडिक हे लोकसभेच्या दृष्टीने चर्चा करण्यात मग्न होते. सत्यजित कदम आणि समीर शेठ यांच्यासोबत त्यांची नियोजनाची चर्चा सुरू होती. याचवेळी रुईकर कॉलनीतील मैदानाच्या विकासासाठीचे रेखाचित्र घेऊन त्या कामाबाबत आर्किटेक्ट यांच्यासोबत महाडिक यांची चर्चा सुरू होती.

सचिन चव्हाणही कामातकाँग्रेसच्या कार्यालयात शहराध्यक्ष सचिन चव्हाण हे शहरातील मतदारांच्या याद्या फोडून ते वितरण करण्याच्या नियोजनात होते. त्यांच्यासमवेत सुजित देसाई, संपत चव्हाण पाटील, किशोर खानविलकर, अरुण कदम हे देखील कामात होते.

क्षीरसागरांचे निवासस्थान हेच कार्यालयराज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे ‘शिवालय’ निवासस्थान हेच त्यांनी आपले आणि पर्यायाने शिवसेनेचे कार्यालय केले आहे. त्यांच्या पिताश्रींचे निधन झाल्यामुळे सध्या या ठिकाणी सांत्वनासाठी भेटणाऱ्यांची गर्दी अधिक आहे. शिवसेनेची आतापर्यंतची कार्यालये ही पक्षापेक्षा त्या-त्या नेत्यांची म्हणूनच ओळखली जातात.

अन्य कार्यालयांत गरजेनुसार हजेरीटेंबे रोडवरील ‘शेकाप’चे कार्यालय, बिंदू चौकाजवळचे ‘भाकप’चे कार्यालय, शरद पवार गटाचे शिवाजी स्टेडियमच्या गाळ्यातील कार्यालय, ‘आप’चे उद्यमनगरातील कार्यालय यासारखी अन्य छोट्या पक्षांची कार्यालये रोज उघडून या ठिकाणी कार्यकर्ते बसत असून, गरजेनुसार या ठिकाणी बैठकांचेही आयोजन करण्यात येत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabhaलोकसभाPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस