कोल्हापूर : श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक कोल्हापुरात येत असतात. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकांचे पाय भाजू नयेत, यासाठी मराठा एंटरप्रेन्युअर्स असोसिएशनने पुढाकार घेत प्रदक्षिणा मार्गावर ‘हिट प्रूफ कूल कोट’ करण्यात आला आहे.संस्थेने ५ लाख रुपये खर्च करून दर्शन रांग मार्गावरील जमिनीवर १२ ड्रम पांढऱ्या रंगाचे विशेष कोटिंग केले आहे. या उपक्रमाचा प्रारंभ मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते झाला. यावेळी जयेश कदम, राजू लिंग्रज, नगरसेवक विजय जाधव, गिरीश पाटील, तेज घाटगे, प्रशांत मुचंडी, अजित जाधव, देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, डॉ. संदीप पाटील, डॉ. आर. एम. कुलकर्णी, विजय पाटील आदी उपस्थित होते.
Web Summary : To protect devotees from scorching heat, Kolhapur's Ambabai temple path has received a heat-proof 'cool coat'. The Maratha Entrepreneurs Association spent ₹5 lakh on the project, applying a special white coating to the ground. Madhurimaraje Chhatrapati inaugurated the initiative, benefiting pilgrims visiting the temple.
Web Summary : श्रद्धालुओं को भीषण गर्मी से बचाने के लिए, कोल्हापुर के अंबाबाई मंदिर मार्ग पर एक हीट-प्रूफ 'कूल कोट' लगाया गया है। मराठा एंटरप्रेन्योर्स एसोसिएशन ने परियोजना पर ₹5 लाख खर्च किए, जमीन पर एक विशेष सफेद कोटिंग लगाई। मधुरिमाराजे छत्रपति ने इस पहल का उद्घाटन किया, जिससे मंदिर आने वाले तीर्थयात्रियों को लाभ होगा।