शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

उसाला तुरा, वजनाला मारा, शेतकऱ्यांवर अडचणींचा फेरा; पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात 'इतक्या' टक्क्यांपर्यंत घट

By राजाराम लोंढे | Updated: January 2, 2023 16:05 IST

कोल्हापूर जिल्ह्यात वजन घटण्याचे प्रमाण तुलनेत अधिक असल्याने दोन लाख टन गाळप कमी होऊ शकते.

राजाराम लोंढेकोल्हापूर : उसाला यंदा लवकर फुलोरा आल्याने वजनात मोठी घट होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात वजन घटण्याचे प्रमाण १०, तर मराठवाड्यात हेच २५ टक्क्यांपर्यंत राहिले आहे. सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे ही तफावत दिसत असून, सर्वच कारखान्यांची उद्दिष्ट गाठताना दमछाक होणार आहे.राज्यात मागील हंगामात राज्यात १४ कोटी टन गाळप झाले होते. यंदा त्यापेक्षा अधिक होईल, असा ठोकताळा कारखान्यांचा होता. मात्र, उसाच्या वजनात घट होत असून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत एकरी पाच ते सात टन ऊस कमी मिळत आहे. हेच प्रमाण मराठवाड्यात अधिक असून, २५ ते ३० टक्के घट दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात वजन घटण्याचे प्रमाण तुलनेत अधिक असल्याने दोन लाख टन गाळप कमी होऊ शकते.वाढीच्या वेळीच धुवादार पाऊसउसाची वाढ ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत गतीने होते. सप्टेंबरमध्ये कडक ऊन पडल्याने वाढ जोमात होते. मात्र, यंदा जोरदार पाऊस झाला. त्यात परतीचा पाऊस ऑक्टोबरपर्यंत राहिल्याने उसाची वाढच खुंटल्याने त्याचा परिणाम वजनात दिसत आहे.

राज्यात खोडवा ऊस अधिकराज्यात यंदा खोडव्याच्या उसाचे पीक तुलनेत अधिक असल्याने सरासरी २५ ते ३० लाख टन उसाचे उत्पादन कमी होईल, असा अंदाज आहे.

तुरा लवकर येणारे वाणको ७२१९, कोसी ६७१, को ९४०१२ या वाणांमध्ये तुरा लवकर येतो. को ७४०, को ७१२५, को ८०१४, को २६५ मध्ये तुरा उशिरा येतो.

तुरा का येतो :

  • शेतामध्ये पाणी साठून राहणे.
  • पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात नायट्रोजनची कमतरता.

काय करावे :

  • पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात थोडा पाण्याचा ताण देणे.
  • पॅराक्वाट या रसायनाची फवारणी.
  • भरणीच्या वेळी फवारणी केली तर अधिक फायदा.
  • उसाच्या शेंड्याजवळील पाने पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात काढणे.

 

सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे यंदा उसाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे किमान १० टक्के गाळप कमी होऊ शकते. - विजय औताडे, साखर उद्योगातील तज्ज्ञ. 

खतांचे वाढलेले दर आणि मजुरांची वानवा पाहता, उसाचा उत्पादन खर्च आवाक्याबाहेर गेला आहे. वजन घटीने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे. - ज्योतिराम खाडे, शेतकरी.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने