शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धुवाधार पावसामुळे पंचगंगा तिसऱ्यांदा पात्राबाहेर, कोल्हापूर जिल्ह्यातील ५१ बंधारे पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 14:21 IST

पंचगंगा यंदाच्या मान्सूनमध्ये तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी पावसाचा जोर कायम राहिला. धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असल्याने धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी रात्री उशिरा पंचगंगा यंदाच्या मान्सूनमध्ये तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे. जिल्ह्यातील ५१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे.गेली दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर आहे. रविवारी रात्रीपासून थोडा कमी झाला होता, मात्र सोमवार सकाळपासून वाढला. गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, चंदगड तालुक्यात जोरदार पाऊस कोसळला. आज, मंगळवारी पंचगंगा नदीच्या पातळी ३० फूट १ इंच इतकी होती.

राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा काल, सोमवारी पहाटे बंद झाला होता. मात्र सायंकाळी साडेसहा वाजता तो पुन्हा उघडल्याने धरणातून प्रति सेंकद ५८८४ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरु आहे. विविध नद्यांवरील ५१ बंधारे पाण्याखाली गेल्याने जिल्ह्यातील वाहतूक काहीसी विस्कळीत झाली आहे. पंचगंगा सायंकाळी काठोकाठ भरुन वाहत होती, रात्री उशिरा ती यंदाच्या मान्सूनमध्ये तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडली.दरम्यान, कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरणात अचानक बदल झाला आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात वाऱ्याची दिशा बदलल्याने जोरदार पाऊस कोसळत आहे. आज मंगळवारी कोल्हापुरात ‘ऑरेंज’ अलर्ट दिला असून, जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पडझडीत पावणेतीन लाखांचे नुकसान

साेमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील २९ खासगी मालमत्तांची पडझड होऊन पावणेतीन लाखांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

काढणीस आलेले सोयाबीन अडचणीतहातकणंगले, शिरोळ तालुक्यात काही ठिकाणी सोयाबीन काढणीस आले आहे. मात्र पावसाने हे पीक अडचणीत आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसriverनदी